सौ. शोभा देशपांडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत aaji sathi marathi kavita विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
aaji sathi marathi kavita
काव्यबंध समुह स्पर्धा
दिनांक -१४-०९-२०२३
आजीची छकुली | aaji sathi marathi kavita

गोड आजीची छकुली
खळी पडे गालावरी
घारे डोळे केस भुरे
असे सुंदरशी परी
हसे मोहक लाडीक
नाचे तालात सुरात
गाणी तोंंडपाठ सारे
गाते सुरेल स्वरात
गोष्ट लागते सांगाया
पऱ्या आवडती खूप
बदलत वेषभूषा
करी तसलेच रुप
सहवास आनंदाचा
सख्या येती खेळायला
डिजे लागतो जोरात
पदन्यास करायला
लेक, नात, विद्यार्थीनी
छोटी बहिण भावाची
दिदी लागते सोबती
शान अमुच्या घराची.
सौ.शोभा देशपांडे
छत्रपती संभाजीनगर

aaji sathi marathi kavita
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह