दुधावरची साय | Best aaji varil kavita in marathi 2023

दुधावरची साय | Best aaji varil kavita in marathi 2023

दीपा दामले यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत aaji varil kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

aaji varil kavita in marathi

काव्यबंध समूह
काव्यलतिका
स्पर्धासाठी
दिनांक:- १४/०९/२०२३
विषय :- आजीची छकुली

दुधावरची साय | aaji varil kavita in marathi

Best aaji varil kavita in marathi 2023

स्निग्ध मृदू नि मधुर
जशी साय दुधावर
गोड छकुली आजीची
आणी हसू ओठांवर

मऊ कुशीत आजीच्या
लाभे हक्काचा जिव्हाळा
ऊब मायेची ओढता
झुले प्रेमाचा हिंदोळा

भिरभिरे घरीदारी
फुलपाखरासारखे
हाक तिची येता ऐकू
जीव आजीचा हरखे

नवलाई नयनांत
ओठी बोबडाले बोल
किलबिल छकुलीची
आजीसाठी अनमोल

हट्ट धरून ती कधी
लटकेसे रागावते
खाऊ हातात ठेवता
पुरी गालांची फुटते

नात लाडाची कोडाची
आनंदाची उधळण
लावे आजी नित्य तिला
सुसंस्कारांचे वळण

गोष्ट राम नि कृष्णाची
आजी रात्रीस सांगते
जडावल्या पापण्यांनी
नात मांडीत झोपते

स्वप्नी रत होता परी
रूप तिचे आजी पाही
चिमुकल्या मुठीमध्ये
टोक पदराचे राही

सुरकुतलेली काया
सान स्पर्शाने बहरे
मरगळलेले मन
तिच्या प्रेमाने तरारे

दीपा दामले
बोरिवली, मुंबई

aaji varil kavita in marathi

aaji varil kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *