नयनाची ज्योत | best ajoba kavita marathi 2023

नयनाची ज्योत | best ajoba kavita marathi 2023

मनोहर गंगाराम राठोड यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत ajoba kavita marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

ajoba kavita marathi

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका गुरुवारची स्पर्धा
विषय – आजोबांची छकुली

नयनाची ज्योत | ajoba kavita marathi

best ajoba kavita marathi

तीन मुलांचा बाप
मुलगी नव्हती घरी
नातीच्या रूपाने
आली सुंदर परी

आजोबा झाल्याचा
हर्ष मावेना मनी
लक्ष्मी बनून आली
नात माझी गोजिरवाणी

लाड किती करू
माझ्या गोड नातीचा
आधार जणू झाली
विझणाऱ्या वातीचा

मुकलो मुली प्रेमाला
सदा आठवण करून
जीवनातली उणीव
नातीने काढली भरून

होऊनी छोटं बाळ
तिच्या संगतीने खेळी
नवसंजीवनी मिळाली
जीवनाच्या सांजवेळी

नाव ठेवलं छकुली
साऱ्यांनी खुशीत
कशी मुळमूळ हसे
आजोबाच्या कुशीत

आजोबांची लाडकी
घरभर तुरूतुरु पळे
हाक देता छकुली
हळूच मागे वळे

तिच्यापुढे ना चाले
कोणाचीच गडबड
बोबड्या बोलांची
ऐके सारे बडबड

घरात साऱ्यांनाच
लागला तिचा लळा
पण आजोबांचा मात्र
वेगळाच कळवळा

नातीच्या प्रेमाने बघा
मन भरले ओतप्रोत
छकुली आहे म्हणे
माझी नयनाची ज्योत

सुंदर, नाजूक नात
अशीच अंगणी खेळू दे
माझे उरलेले आयुष्य
तिच्या आयुष्यात मिळू दे

मनोहर गंगाराम राठोड
पुसद
जि. यवतमाळ

ajoba kavita marathi

ajoba kavita marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *