सौ. रंजिता अमोल गोवेकर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत ajoba kavita marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
ajoba kavita marathi
काव्यबंध साहित्य समूह
स्पर्धेसाठी
विषय :-आजोबांचा छकुला
आजोबा आणि नातवाच नातं | ajoba kavita marathi

इवल्या इवल्याशा पावलांनी
जेव्हा ताबा घेतला घराचा
एका क्षणात सगळचं बदललं
आणि झाला आजोबा बाबाचा…
इटुकल्या पिटुकल्या डोळ्यांसोबत
आजोबांच्या मनाचेही बाळ होते…
दोघांच्याही वयातलं अंतर
एका smile मध्ये पार होते….
बरं या आजोबांना नातवाला
कुणीच रागवलेल चालत नाही….
ओरखडा जरी आला पिलाला
तरीही काळीज स्थिर राहत नाही…
हरवलेलं बालपण कोवळ
पुन्हा पुन्हा सापडतं नातवामध्ये….
खांद्यांवरती बसवून बाळराजांना
मनाला वाटे भारीच जगामध्ये….
नातवाचा पहिला वहिला
Besty… फक्त तो आणि तो…
आणि त्याच्या आयुष्यातला
शेवटचा त्याचा नातू असतो….
वेगळं कसं म्हणावं….?
त्याची सावली ‘तो’…आणि
त्याच्या आत्म्याचा ‘तो’ भाग असतो….
दोन शरीरांमध्ये वाहणाऱ्या
एकाच चैतन्याची जाण असतो…
खरंच नशीबवान असतात ती लेकरं
ज्यांच्या शिरावर
आजोबा नावाचं छत्र असतं….
संकटांच पाऊस कितीही मोठं
झेलणार आजोबांसारखं वटवृक्ष असतं…..
सौ. रंजिता अमोल गोवेकर
अलिबाग
ajoba kavita marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह