नरेंद्र आनंदराव मोरे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Ajoba miss you quotes in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
Ajoba miss you quotes in marathi
काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका गुरुवारची स्पर्धा
दिनांक – १४/०९/२०२३
स्पर्धा विषय- आजोबांचा छकुला
साहित्य प्रकार – काव्य लेखन
जीवनात रंग भरण्या नव्याने | Ajoba miss you quotes in marathi

घरात जेव्हा तान्हूला बाळ,जन्म घेवूनी आला
हर्ष तेव्हा घरच्यांचा गगनपार झाला…!!१!!
आजोबाच्या डोळ्यातून मात्र, आनंदाश्रू गळू लागले
एकांतवास संपला जीवनाचा,त्यांना आता कळू लागले…!!२!!
जन्मास आला नव्या रूपाने,आधार आजोबांचा होवून
आभार मानले ईश्वराचे,मुख बाळाचे पाहून…!!३!!
जीवनसाथी सोडून जाता,दिवस एकांतात काढत होता
खिन्न बसून एकट्यात,आजोबा मनोमन रडत होता…!!४!!
गळणाऱ्या अश्रूंचे आता,हास्यात रूपांतर झाले
आजोबांचा छकुला नातू,जन्माला होते आले…!!५!!
प्रसन्न वाटे आजोबांच्या मनाला,बाळास गोंजारतांना
वेळ निघून जात होता,दिनरात त्याच्याशी खेळतांना…!!६!!
दुळुदुळू आजोबासमोर घरभर तो चालत होता
पकडुन बोटाला त्यांच्या,बोबडे बोल तो बोलत होता…!!७!!
जावू लागले आयुष्याचे,दिवस आजोबांचे आनंदाने
जीवनात रंग भरण्या नव्याने,पाठवले जणू त्याला देवाने…!!८!!
नरेंद्र आनंदराव मोरे…
जि.अमरावती
Ajoba miss you quotes in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह