सौ. भक्ती केंजळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत ajoba poem in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
ajoba poem in marathi
काव्यबंध समूह आयोजित स्पर्धा
विषय – आजोबांचा छकुला
दिनांक 14 सप्टेंबर 2023
आजोबांची माया | Best ajoba poem in marathi

आई वडील माझे नोकरी करणारे
घरात मी आणि माझे आजी आजोबा असायचे
त्या दोघांचा लळा आणि सहवास मला खूपच आवडे
त्यामुळेच आजोबा व माझे चांगले ट्युनिंग जमायचे
आजोबांचा स्वभाव शांत समजूतदार आणि गोड होता
मीही शांत असाच होतो मस्ती मला माहितही नव्हती
आणि त्यातच आजोबांचा सहवास त्यांची शिकवण
पिंगा घालतच मोठा होत होतो आजोबांच्या भोवती
शांत कसे राहायचे प्रसंगानुरूप
बऱ्याच गोष्टी सांगत सांगत त्यांनी मला वाढवलं
त्यामुळे मला जुन्या चित्रपटांची आवड निर्माण झाली
आजोबांमुळेच माझे लहानपण होतं जोपासलं
आजोबा बाजार करायचे तेव्हा
मुद्दाम माझ्यासाठी काही गोष्टी घेऊन यायचे
आजोबा आमचे तलाटी होते
कामामुळे घरी कामावरून उशिरा परतायचे
सौभक्ती केंजळे
करंजे पुणे
ajoba poem in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह