काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.सुनिता जयदीप पाटील यांची -गणपती – हि कविता -Anant Chaturdashi Caption- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
गणपती By सौ.सुनिता जयदीप पाटील| Best Anant Chaturdashi Caption 2023
गणपती | Anant Chaturdashi Caption 2023

गौरी आणि गणपती
माझा सर्वात आवडता सण
गणपती गेले गावाला
अन कुठेच रमेना माझे मन !!1!!
आरास करण्या गणपतीची
धावत होते सर्वजण
रिकामे मकर पाहून आज
आठवतात मला ते सर्व क्षण !!2!!
लाडू आणि मोदक असे
बाप्पाची आवडती डिश
२१ मोदकांचा नैवेद्य देऊन बोलतात
बाप्पा पूर्ण करा माझी विष !!3!!
मंगलमूर्ती विघ्नहरा हा
गणपतीचा मंत्र भारी
जपता सदा पूर्ण होते इच्छा
ही गणपतीची किमया न्यारी !!4!!
गणपती आणि माझी
जमली होती साखळी
गणपती गेले गावाला
मनात तयार झाली पोकळी !!5!!
शंकर आणि पार्वती
मांडीवर बसले गणपती
सोशल मीडियावर या गाण्याची
झाली आहे ख्याती !!6!!
सुंदर रूप मकरा मध्ये
दिसते गणपतीचे
शोभून दिसते मांडीवर
लेकरू पार्वतीचे !!7!!
विघ्नहरण्यासाठी गणपतीला
प्रार्थना करतात सर्वजण
इच्छा पूर्ण झाल्यावर
तृप्त होते त्यांचे मन !!8!!
गणपतीच्या मनातील
सुंदर भाव मला दिसला
गणपती गेले गावाला आणि
आज माझा चेहरा रुसला !!9!!
गणपतीने विश्वामध्ये
कमाल आहे केली वेगळी
एका दिवसाच्या शापाने
चंद्राची शान गेली सगळी !!10!!
आनंदीत होते सर्वजण
गणपतीचे रूप पाहून
अकरा दिवसांचा पाहुणा
गेला घरात राहून !!11!!
माहेरवाशीन पोरी सारखा
गणपती माझ्या घरात होता बसला
सर्वांना सोडून एकटाच गेला
मागे सर्व परिवार मात्र रुसला !!12!!
काहीजणांनी गणपतीपुढे
धरणे होते धरले
आज त्याच्या जाण्याने
डोळे पाण्याने आहेत भरले !!13!!
मंडळाच्या गणपतीपुढे तर
न्यारीच असते आरास
देहभान विसरून सगळे
आरती करतात खास !!14!!
सगळे दूध उतू गेले
साय मात्र वाचली
गणपतीच्या जाण्याने
मनात दुःखाची पोती साचली !!15!!
निरागस आहोत बाप्पा
आम्ही पृथ्वीवर राहतो
विघ्न दूर व्हावे म्हणून
तुझ्याकडे आशेने पाहतो !!16!!
विनवणी करते तुला
बाप्पा नकोस ना जाऊ
रोज बनविन मी तुला
तुझा आवडता खाऊ !!17!!
आज गणपती गेले गावाला
काळजाच्या माझ्या झाल्या काचा
साहित्य प्रेमी मित्र-मैत्रिणींनो
माझी “गणपती” कविता नक्की वाचा !!18!!
गणपती By सौ.सुनिता जयदीप पाटील| Best Anant Chaturdashi Caption 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
गणपती By सौ.सुनिता जयदीप पाटील| Best Anant Chaturdashi Caption 2023