काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.वैष्णवी परेश कुळकर्णी यांची -सांगाती तू साऱ्यांचा- हि कविता -Anant Chaturdashi Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
सांगाती तू साऱ्यांचा By सौ.वैष्णवी परेश कुळकर्णी | Best Anant Chaturdashi Kavita 2023
सांगाती तू साऱ्यांचा | Anant Chaturdashi Kavita 2023

ढोल ताशांच्या गजरात तू येता उठती आनंदाचे लोट,
पण तू स्वगृही निघालास की डचमळून निघते पोट !
गुलालाने स्नान करत जल्लोषात आला होतास तू ,
आता भक्तांची सेवा आणि प्रेम मनात घेऊन निघालास तू!
दहा दिवस तू होतास आमच्या मंडपात थाटात बसलेला,
आता मंडप होणार सगळा सूना सूना चैतन्य नसलेला !
भजने , आरत्या अन् जयजयकाराने दुमदुमली होती पंचक्रोशी ,
अर्पिले होते लाडक्या गजाननाला मोदक जे तू आनंदे सेविले साजूक तुपाशी !
जो तो आपल्या लाडक्या बाप्पाला भेटायला मंडपात येई ,
बघून मोहक साजिरे राजस रुपडे तुझे प्रत्येकजण सुखी होई !
भक्तांच्या मनात आणि आयुष्यात अनन्य असे आहे तुझे स्थान ,
प्रत्येकाच्या घरी विराजमान होऊन तूही वाढवतो त्यांचा मान !
खरं तर ही समजूत आम्हा भाबड्या भक्तांची की
तू येतोस आणि जातोस,
पण तू तर या सृष्टीच्या चराचरात व्यापून असतोस !
दृष्टीआड होते ती केवळ तुझी पाषाणातली मूर्ती,
सालंकृत अशा जिला पाहून मिळत होती १० दिवस स्फूर्ती !
आता उरेल केवळ तुझे आणि तुझ्या भक्तांचे विरहाचे गान,
तुला निरोप देताना हरवून जाईल कित्येकांचे भान !
चिमुकली तर हमसून हमसून रडतील नको जाऊस ना बाप्पा,
तू गेलास तर मी कुणासोबत मारेन शाळेतल्या गप्पा ?
आता मी कुणाला देऊ मोदक अन् कुणाची करू आरती ?
तूच तर आहेस खरा माझ्या बालमनाचा सांगाती !
गृहलक्ष्मी साठी तर तूच आहेस , माता ,पिता ,भाऊ अन् सखा,
तू गावाला गेल्यावर तर पार न राही त्या माऊलीच्या दुःखा !
पण येताना आणला तसाच जातानाही तू आनंदच देशील,
भक्तांच्या पाठ राखणाचे उत्तरदायित्व तू पुन्हा तुझ्या शिरावर घेशील !
पुन्हा एकदा मग आस लागेल तुझ्या पुढील वर्षीच्या आगमनाची,
११ महिने तू दिलेली ऊर्जा वापरायची अशी सज्जता होईल मनाची !
परि गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला,
आठवणींचा ठेवा केवळ आता उरला साऱ्या जगाला !
सांगाती तू साऱ्यांचा By सौ.वैष्णवी परेश कुळकर्णी | Best Anant Chaturdashi Kavita 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
सांगाती तू साऱ्यांचा By सौ.वैष्णवी परेश कुळकर्णी | Best Anant Chaturdashi Kavita 2023