काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.राधा खानझोडे यांची -पुन्हा वाट बाप्पा तुझ्या आगमनाची – हि कविता -Anant Chaturdashi Marathi Images- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
पुन्हा वाट बाप्पा तुझ्या आगमनाची By सौ.राधा खानझोडे | Best Anant Chaturdashi Marathi Images 2023
पुन्हा वाट बाप्पा तुझ्या आगमनाची | Anant Chaturdashi Marathi Images 2023

आता श्रावण सरला
आले आले गजानन
असा कल्लोळ माजला
झाले बाप्पा आगमन…!!१!!
यावे यावे हो नाचत
व्हावे मूषकाते स्वार
सुखकर्ता दुःखहर्ता
आम्ही आहोत तयार…!!२!!
आले आले गणराज
करू बाप्पांचे स्वागत
पंचारती मी घेऊन
उभी प्रसन्न दारात…!!१!!
सडा रांगोळ्याने कसे
माझे सजले अंगण
बाप्पा आपल्या येण्याने
हर्ष नभ तारांगण …!!२!!
नऊवारी अलंकार
घालुनिया मी सजले
ढोल ताशे गजरात
बाप्पा आमचे गाजले…!!३!!
झेंडू फुलांच्या माळांनी
घर केले शोभिवंत
मंद मंद सुवासाने
दरवळे आसमंत..!!४!!
आता प्रतीक्षा संपली
आतुरले माझे मन
आले नाचत नाचत
गोड अलौकिक क्षण….!!५!!
दीपमाळा लावियल्या
घर माझे उजळले
आले आले गणराज
मखरात बसवले…..!!६!!
काय सांगू बाप्पा आता
झाला आनंद हा भारी
हर्ष मावेना मनात
माझी दुनियाच न्यारी…
आतुरता माझ्या मनी
मज लागे हूरहूर
चित्ती प्रसन्नता वाटे
झाले गणेशा आतुर….
रंग रंगोटी घराला
दारी तोरण सजले
आता येतीलच बाप्पा
सारे जण आनंदले…
माघ शुद्ध चतुर्थीला
जन्म देवा गणेशाचा
अलौकिक सोहळा तो
हर्ष मनी उल्हासाचा …!!७!!
शुभकार्या मान देवा
गणेशाची आराधना
मीळे मोक्ष प्राप्तीसाठी
करू नित्य उपासना…!!८!!
आहे व्रताचे महत्त्व
बघा पुरानात भारी
मनोभावे करू पूजा
देव संकटाला तारी…!!९!!
खूप आनंदलो होतो
बाप्पा तुझ्याच येण्याने
येतो कंठ हा भरून
आता तुझ्याच जाण्याने…!!१०!!
दहा दिस गणराया
चाले उत्सव हा छान
घेती भाग आनंदाने
उत्साहाने थोर सान…!!११!!
दहा दिवस कसे हे
नाही कळले कुणाला
आली जाण्याची ही वेळ
दुःख वाटते मनाला…!!१२!!
आता निरोपाची वेळ
अश्रू दाटले नयनी
सानथोर व्याकुळले
अति दुःख मनोमनी..!!१३!!
सांगा बाप्पा काय करू
गेले आपण गावाला
वाट तुमच्या येण्याची
चैन पडेना आम्हाला…!!१४!!
गजानना तुम्हा मुळे
प्रसादाची रेलचेल
गेले सोडूनआम्हाला
आता कुठून मिळेल…!!१५!!
आता पुढल्या वर्षीच
आम्हा दर्शन होणार
वाट पाहू त्या दिसाची
अवघड हे जाणार…!!१६!!
पुन्हा वाट बाप्पा तुझ्या आगमनाची By सौ.राधा खानझोडे | Best Anant Chaturdashi Marathi Images 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
पुन्हा वाट बाप्पा तुझ्या आगमनाची By सौ.राधा खानझोडे | Best Anant Chaturdashi Marathi Images 2023
Om Sai Ram 🙏 👍 Excellent Tai 👍
उत्तम राधा खानझोडे