काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कुमारीरिंकू राजेश बागडे यांची -बाप्पाला पत्र – हि कविता -Anant Chaturdashi Marathi Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
बाप्पाला पत्र By कुमारी रिंकू राजेश बागडे | Best Anant Chaturdashi Marathi Kavita 2023
बाप्पाला पत्र | Anant Chaturdashi Marathi Kavita 2023

बाप्पा बप्पा तुला पत्र लिहिते,
पत्रात आपल्या खूप आठवणी लिहिते…
लिहिते पत्रात मला तुझी खुप आठवण येते
माहित नव्हते मला तू दहा दिवसातच परत गावी जाते
आठवते का तुला, दिवस तो गणेश चतुर्थीचा होता ,
हर्षाने तू आमच्या दारात आला होता
गाजाबाजासोबत मंडपात तुमचे आगमन झाले होते
आनंदात तुझ्या सारे गाव हर्षून गेले होते..
उभे होते सगळे आरती घेऊन हातात ,
स्वागत तुझे झाले होते खुप थाटात….
आठवते का तुला आईने माझ्या नवीन साडी घातली होती ,
तुझ्या येण्याची जणू खुप आतुरतेने वाट पाहत होती…
रोज दिवसाची सुरुवात तुझ्या आरतीने व्हायची,
सेवेत सगळे लोक तुझ्या तल्लीन होऊन जायची
आई रोज नवनवीन पदार्थ बनवायची,
प्रसाद म्हणून मोदक आम्हालाही द्यायची..
मोदकाच्या लालच्याने आम्ही रोज तिथे यायचो,
प्रसादाच्या रुपात तुझा आशीर्वादही घ्यायचो…
मुषकाला बघून गलाताच हसला
शिव पार्वती च्या मांडीवर गणराया बसला
गणराया लागला आता तुझाच रे छंद ,
दिसतो तूच डोळे होताच बंद…
नाव तुझे विघ्नहर्ता आहे
घरी तुझ्या येताच सगळे दुःख जाये…
परीक्षेची मला खूप भीती वाटायची
तुझ्या चरणी येताच भीती पडून जायची…
त्या दिवशी मी खूप रडले
तू गावी जाते जेव्हा मला हे कळले …
कृपा तुझी असावी मज गरिबावर
डोळे बंद करून विश्वास आहे तुझ्यावर…
मिळूनी आपण सगळ्यांनी प्रेमाने राहावे
जिथे – जिथे जावे तिथे तुझेच रूप पहावे ….
दरवर्षी देवा तुझ्या आगमनाची वाट असते
संगतीला तुझ्या शिव पार्वतीही दिसते….
तू घरी येताच सुख समृदी ही येते
दुःख आणि निराशा तुझ्यासमोर नतमस्तक होते …
त्या दिवशी सगळ्यांनी तुला नदीत शिरावले
पण नदितले पाणी मात्र माझे अश्रू बनून वाहले….
बाप्पा तू नसताना घर विरान वाटते
ते म्हणतात ना असल्याची किंमत नसल्यावर कळते….
एकदंत दयावंत तू विघ्नहर्ता
या दुनियेचा तू एकमेव कर्ताधर्ता…
बाप्पाला पत्र By कुमारी रिंकू राजेश बागडे | Best Anant Chaturdashi Marathi Kavita 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
बाप्पाला पत्र By कुमारी रिंकू राजेश बागडे | Best Anant Chaturdashi Marathi Kavita 2023
Excellent
खूपच मस्त
Thank you ☺️