काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी रवी आटे यांची -विघ्नहर्ता – हि कविता -Anant Chaturdashi Marathi Messages- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
विघ्नहर्ता By रवी आटे | Best Anant Chaturdashi Marathi Messages 2023
विघ्नहर्ता | Anant Chaturdashi Marathi Messages 2023

विवेक बुद्धी निर्माण करून चित्त शांत करणारा
आला आला माझा गणपती विघ्ने सर्व दूर करणारा
विवाह असो की गृहप्रवेश अथवा असो कोणताही प्रसंग
कोणत्याही कार्याच्या आरंभी करावयाचे असते त्याचेच पूजन
ओंकार स्वरूप आहे तो
संगीतात आणि नृत्यात प्रवीण
स्वरब्रह्माच्या नादाने धन्य झाली जमीन
संगीताशी त्याचे नाते सांगितले आहे गणेश वरदस्तोत्रात
ज्ञानेश्वर माऊली व सारे संत वदले त्यांच्या अभंगात
नर्तकाचे त्याचे रूप आकर्षक दिव्य प्रकाशात
आठ हात आणि डावा पाय पद्मासनात
उजवा पाय भव्य अधांतरी
असे त्याचे रूप मनोहारी
तांबडा रंग विनायकाला भुलवी
तांबडी कमळे तांबडी फुले
गणेशाचे मन फुलवी
तुळशीने मात्र चतुर्थी व्यतिरिक्त होतो खिन्न
मग काही केल्या होत नाही तो प्रसन्न
जपावे लागते गजाननाला
मात्र आशीर्वाद देतो
पाहताच फुलाला
उंदीर त्याचे वाहन
काळाचा प्रतीक असतो
सृष्ट पदार्थ कुरतडतो
गणपती काळाला जिंकून
झाला काळावर स्वार
तोच तर करतो शक्ती प्रवाहित
जगात आणि आत्म्यातअपार
विश्वाची देवता जरी
प्रथम प्रदक्षिणा गजाननाने
घातली शिवपार्वतीला
असंख्य पुराणात तसेच
महाभारतात जागोजागी
नमन असे या वैदिक देवतेला
डोके त्याचे विशाल दूरदृष्टी अन व्यापक विचार दर्शविते
तर अथांग ज्ञान गंगा
मानवात भक्ती जागवते
त्याच्या छोट्या डोळ्यांपासून
जाणून घ्यावी एकाग्रता
कान त्याचे मोठे बघून
व्हावे माणसाने चांगला श्रोता
सर्व काही देतो गणेश
सोंडेची त्याच्या लवचिकता बघा
त्याप्रमाणे अनुकूल अशी
भक्ती साधा
बाप्पाचे मोठे पोट स्मरणात ठेवा
कष्ट करीत जा मात्र
सहनशक्ती ठेवा
त्याच्या कुऱ्हाडीला लक्षात ठेवा
पक्षपाताला बळी पडू नका
अष्ट दिशांचा तो मालक
असे प्राणशक्ती वाढविणारा
संपूर्ण देवगणांचा स्वामी
म्हणून प्रथम पूजनीय
केवळ बाप्पा
बुद्धी अन् वाणीवर नियंत्रण शिकवितो
साधनेला आमच्या योग्य दिशा देतो
सौम्य गणपती काय किंवा महागणपती काय
किती विविध रूपे
आहेत त्याची
विसर्जनासाठी बाहेर काढताच अडथळे होतात दूर
सालाभराची
मात्र तो घरी असताना
काळ कसा भुरकन उडून गेला
लगेच आमच्या मनी भाव आला
गणपती निघाले गावाला
चैन पडेना आम्हाला…
विघ्नहर्ता By रवी आटे | Best Anant Chaturdashi Marathi Messages 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
विघ्नहर्ता By रवी आटे | Best Anant Chaturdashi Marathi Messages 2023