गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला By श्री.मनोहर गंगाराम राठोड | Best Anant Chaturdashi Marathi Quotes 2023

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला By श्री.मनोहर गंगाराम राठोड | Best Anant Chaturdashi Marathi Quotes 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.मनोहर गंगाराम राठोड यांची -गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला – हि कविता -Anant Chaturdashi Marathi Quotes- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला By श्री.मनोहर गंगाराम राठोड | Best Anant Chaturdashi Marathi Quotes 2023

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला | Anant Chaturdashi Marathi Quotes 2023

Anant Chaturdashi Marathi Quotes Ganpati Bappa Quotes in Marathi 2023

*काव्यबंध – दीर्घ कविता लेखन स्पर्धा*

*विषय – गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला*
*शीर्षक – विराम लागला हर्षाला*

का पडलाय चेहरा?
काय सांगू तुम्हाला
गणपती गेले गावाला
चैन पडेना आम्हाला

एक तो दिवस होता
बापाच्या आगमनाचा
चेहरा कसा प्रफुल्लित
दिसे प्रेत्येक जणाचा

वेध लागता आगमनाचे
दुःखाची झाली वजावट
थकवा जराही नव्हता
मंडपाची करता सजावट

मजा न्यारीच होती
जणू फिरतोय दिल्ली
वर्गणी जमा करण्या
हिंडायचो गल्लो गल्ली

कुणी लावी पळवून
कुणी देत असे हसत
वर्गणी देणारे इसम
सगळेच सारखे नसत

तयारी करून सारी
आनंदाने पाही वाट
दहा दिवस रंगणार
बाप्पाचा रंगीत थाट

वाजत गाजत झाले
आगमन बाप्पाचे घरोघरी
लहान थोर सारेच
मनोभावे आरती करी

मोदक, लाडू प्रसाद
बाप्पापुढे ठेवू ताटात
नाव घ्यायचो बाप्पाचे
जायचे आमच्या पोटात

स्वारी बापाची असता
मनी दुःख नसायचे
वेगवेगळे पाहुनी रूप
बाप्पा मनात वसायचे

जल्लोष दहा दिवस
आनंदाला नव्हता घाटा
जणू मोकळ्या झाल्या
बंधिस्त साऱ्या वाटा

बाप्पानी दिले पंख
नाते मनोमनीचे जडे
मनसोक्त असा जगलो
आकाशी पाखरू उडे

भुर्रकन उडाले दिवस
बाप्पाचे विसर्जन झाले
नाचलो जरी बेधुंद
नयनी अश्रू आले

निरस झाले तन-मन
करमेना कुठे बसताना
उत्सव रोजच वाटायचा
बाप्पा घरी असताना

चोहीकडे दिसू लागली
रखरख मना मनातली
न राहिली ती आता
गजबज घरा घरातली

वाट पाहू आम्ही सर्व
तुझे नव्याने येण्याची

बाप्पा आले घरोघरी
शांतता पसरली चहुकडे
हसले गाव मनात त्यांच्या
शांतता पाचवीकडे
जाता गणपती गावाला
विराम लागला हर्षाला
वचन पक्के घेतले
येण्याचे पुढच्या वर्षाला

*मनोहर गंगाराम राठोड*
*पुसद जि यवतमाळ*
8208861758

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला By श्री.मनोहर गंगाराम राठोड | Best Anant Chaturdashi Marathi Quotes 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला By श्री.मनोहर गंगाराम राठोड | Best Anant Chaturdashi Marathi Quotes 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *