सूत शिवगौरीचा By रजनी घाटूरले| Best Anant Chaturdashi Marathi Status 2023

सूत शिवगौरीचा By रजनी घाटूरले| Best Anant Chaturdashi Marathi Status 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी रजनी घाटूरले यांची -सूत शिवगौरीचा – हि कविता -Anant Chaturdashi Marathi Status- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

सूत शिवगौरीचा By रजनी घाटूरले| Best Anant Chaturdashi Marathi Status 2023

सूत शिवगौरीचा | Anant Chaturdashi Marathi Status 2023

ganpati gele gavala Visarjan Marathi Quotes Visarjan Marathi Caption Anant Chaturdashi Marathi Status

श्रावण महिना संपताच मराठी वर्षाचा
सुरुवात होताच भाद्रपद महिन्याला
सण उत्साहाचा श्री गणेश स्थापनेचा
भाद्रपद अमावस्येच्या हो चतुर्थीला

जिकडे तिकडे हर्षच हर्ष बाप्पाचा
गणेश स्थापना सार्वजनिक स्थळाला
लोक लागते तयारीला मंडपाच्या
कुठे होणार घरी आगमन प्रारंभ स्वच्छतेला

पाहूनपणा येतोय सुत शिवगौरीचा
बांधतात आंब्याच्या पानाचे तोरण द्वाराला
प्रातःकाळी अंगणी रेखा रांगोळीच्या
फुले सुगंधीत आणतेय हार बनवण्याला

गणेशास आणाया गजर ढोल ताशांचा
दणदण आवाजाने परिसर दुमदुमला
भक्तगणा आनंद त्या तालावर नाचण्याचा
गगन ठेंगणे मंगलमूर्तीच्या जयघोषाला

सोहळा गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा
पंचामृत पवित्र हो गजमुखास स्नानाला
संकटाचा मारक स्वामी साऱ्या जगाचा
सजवितेय चौरंगपाट तयास आरूढ होण्याला

साज चढवी बाजूबंद व शिरी मुकुटाचा
खुलून दिसतोया पिवळे पितांबर लंबोधराला
पूजेत समावेश कापसांचे वस्त्र, जागवे, फळांचा
विडापान, कलेश व मान दुर्वा तुळसपत्र बेलाला

पूजेला मान हळद ,कुंकू ,गुलाल अष्टगंधाचा
आरतीच्या ताटात उजळते दिपज्योतीला
वाहे फुले जास्वंदाचे ,नैवेद्य एकविस मोदकाचा
आनंदले मखरात बघून सजलेल्या गणराजाला

बाप्पाच्या आगमनाने हरेक क्षण प्रसन्नतेचा
कुंकवाचा टिळा लावितोय भाळी गणेशाला
सुखकर्ता दु:खहर्ता रिध्दी, सिध्दी किमयेचा
मस्तक ठेवीतो चरणी आशीर्वादाला

देवांमध्ये चमत्कार बाप्पा मोरयाचा
भक्तांना ताराया दाही दिशा व्यापलेला्
ॐगण गणपतेय नम:जप मंत्राचा
गणपती पावतोय भक्तांच्या नवसाला

शिवपार्वती नंदन अष्टपैलू सर्व कला़चा
दाता तो ज्ञान, बुद्धीचे धन देण्याला
उददे्श टिळकांचा गणेश स्थापनेत समाज एकीकरणाचा
जगी एकता नांदो हेच मागणे दयावंताला

जागोजागी झगमगाट रोषणाईचा
दहा दिवस जोश, भजन व कलास्पर्धेला
शेवट कार्यक्रम कुठे भोजन, कुठे महाप्रसादाचा
आणि वेळ येते विसर्जनाची गणेशाला

देखना प्रसंग चौघडा सवे मिरवणुकीचा
गुलाल उधळून आनंद पोरांना नाचण्याला
प्रसाद खोबरं ,लाह्या ,दही, लोणचं या काल्याचा
आता गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला

सूत शिवगौरीचा By रजनी घाटूरले| Best Anant Chaturdashi Marathi Status 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

सूत शिवगौरीचा By रजनी घाटूरले| Best Anant Chaturdashi Marathi Status 2023

43 thoughts on “सूत शिवगौरीचा By रजनी घाटूरले| Best Anant Chaturdashi Marathi Status 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *