काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.भारती राजेंद्र बागल यांची -बाप्पाला विनंती – हि कविता -Anant Chaturdashi Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
बाप्पाला विनंती By सौ.भारती राजेंद्र बागल | Best Anant Chaturdashi Marathi 2023
बाप्पाला विनंती | Anant Chaturdashi Marathi 2023

धूप दीप आरती केली
चिरमुर्यांची आंघोळ झाली
गणेशाच्या निरोपाची वेळ आली
मोरेश्वरा पापणी ओलावली
जड अंतकरणाने
दिला निरोप विघ्नहर्त्याला
लवकर येण्याची विनंती
आवर्जून केली लंबोधराला
दहा दिवसांचे आराध्य
सिद्धिविनायक गेले गावाला
उदासपण भेडसावले
प्रत्येक घरादाराला
आवाज थांबला ढोल ताशांचा
गणपती गेले गावाला
पांगली पाहुणे मंडळी
चैन पडेना जीवाला
सुनी भासली पटांगणे
आळस भरला उरी
गणपती गौराईचे तसेच अजून
उमटलेले सोन पाऊल दारी
जात धर्म विसरून सारे
एक झालो होतो
गणरायाच्या सोहळ्यात
आनंदे नहालो होतो
गेलात गिरिजात्मका
सुख आनंद उधळून
एक जीवाने राहावा
संदेश हा देऊन
विसरून जात धर्म
एकोपा मनी रुजला
आठवणीने चिंतामणीच्या
आनंदे चेहरा फुलला
महागणपतीच्या कृपेची एक एक आठवण
मखमली हृदयात कुरवाळते
क्षणोक्षणी मन
बल्लाळेश्वराला आळविते
सर्व सुखांचा दाता
बुद्धीची देवता
प्रसन्नता देऊन वाढविते
मनाची एकाग्रता
बेचैनी पाहून भक्ताची
विनायका तुम्ही सद्बुद्धी द्यायचा
विचार बदलवून बळीराजाच्या
गळ्यातला फास काढून न्यायचा
तुम्ही होता तोवर बाप्पा
जल्लोष सारा असायचा
विश्वासावर तुमच्या बप्पा
चिंतेचा निखारा
विझायचा
पावसाने मारली दडी
चाऱ्या विना गोठ्यात हंबरते गाई
सत्तेच्या वादात अडकले सारे
तुमच्या वाचून विनायका वाली कोणी नाही
दुःख मनीचे बल्लाळेश्वरा
सांगावे कुणाला
कोण अडवणार
दुष्ट बुद्धी नराधमाला
दहा दिवसांचा उत्सव
सवंगड्यांचा सहवास
रांगोळी लाइटिंग आरास
साऱ्या विना परिसर वाटतो भकास
तुझ्या निमित्ताने देवा
वेळ क्षणभर मिळायचा
मैत्रिणींच्या मेळ्यात
जीव क्षणभर रामायण
बुद्धीची देवता
सुख आनंदाचा दाता
उदास वाटते मना
विसर्जन त्याचे होता
आगमनाने तुमच्या देवा
जुळली होती कित्येक नवीन नाती
भक्ती भावाचे सुंदर संस्कार
घडत होते बालमनावरती
आली आली म्हणता देवा
सॉरी तुमची निघूनही गेली
आठवणींची शिदोरी ही
मनी उत्साह भरत राहिली
तुम्ही जाताच देवा
घर मोकळे होते
एकटेपणाचे वादळ
वर्षभर मना भेडसावते
तुम्ही येण्याआधीच देवा
उत्साहाचा पूर येतो
एकोप्याचा सोहळा
अविस्मरणीय होतो
विनंती एकच माझी
लवकर यावे अष्टविनायका
गेलात तुम्ही जरी
मन मारते हाका
बाप्पाला विनंती By सौ.भारती राजेंद्र बागल | Best Anant Chaturdashi Marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
बाप्पाला विनंती By सौ.भारती राजेंद्र बागल | Best Anant Chaturdashi Marathi 2023