Anant Chaturdashi Poem in Marathi 2023

बाप्पाचे होता आगमन By सौ.वीणा पाटील| Best Anant Chaturdashi Poem in Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.वीणा पाटील यांची -बाप्पाचे होता आगमन – हि कविता -Anant Chaturdashi Poem in Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

बाप्पाचे होता आगमन By सौ.वीणा पाटील| Best Anant Chaturdashi Poem in Marathi 2023

बाप्पाचे होता आगमन | Anant Chaturdashi Poem in Marathi 2023

Anant Chaturdashi Marathi Kavita Anant Chaturdashi Poem in Marathi

….बाप्पाचे होता आगमन ,आनंदाने गेले घर भरून…
दहा दिवस वास्तव्य ,पाहूणा गणराया आला म्हणून……1

घरादाराची केली साफसफाई ,दारावरी तोरण झळकले…
रंगीत रांगोळीने अंगण ,सुशोभित दिसू लागले……2
हाती त्रिशूल पीतांबर नेसून ,अष्टगंध भाळी दिसे शोभून…
शंकर पार्वतीचा हा सुपुत्र ,मुषकावरी येई बसून….3

लाल जास्वंदी फुल नी दुर्वा ,आवडतात वाहू बाप्पास…
मोदक उकडीचे अन खीर ,जेवू घालू आवडे खास….4

मनोभावे रोज पुजा करून ,सकाळ संध्याकाळी करू आरती…
प्रसाद सर्वाना वाटून ,नमस्कार करता
आशीर्वाद मिळे पाठीवरती….5

रोज ताजी फुले दुर्वा आणून ,गुंग होऊन बसे हार करण्यात.
लवकरी उठून पुजा अर्चा करून ,नेवैद्य दाखवून आनंद वाटे आरती म्हणण्यात ……6

दहा दिवस कसे गेले ना कळले ,सौख्यदाता गणराया येता घरी….
आज निघाले आपुल्या गावा ,उदास झाला जीव बाई काय करू तरी….7

विघ्नहर्ता सुखकर्ता गणपती ,बुद्धीची देवता तो अधिपती..
शुभारंभ होई पुजून गणपती ,मनोकामना पूर्ण करणारा महागणपती …..8

घरोघरी केलेली सुंदर आरास ,प्रत्येकाचा आनंद नव्हता गगनात मावत…
बाप्पापुढे सत्यनारायण पुजाही घाले ,कुणी अथर्वशीर्ष पठणही करी उत्साहात…..9

चौका चौकात रस्त्यावरी ,मंडळाचे होते गणपती दिमाखात…
आज आला विसर्जनाचा दिवस ,उत्साहास पारखे झाले भक्तगण क्षणात….10

निघाली मिरवणूक वाजत गाजत ,प्रेमभराने देऊ चला निरोप लाडक्या बाप्पास….
गणपतीबाप्पा लवकर या लवकर या ,आग्रहाचे देऊ आमंत्रण परत येण्यास….11

गणपती बाप्पा गेले गावाला ,चैन कशी ती पडेना हो आम्हाला….
लहान मोठे सगळे लागले म्हणायला, बाप्पा…बाप्पा..तुमच्या शिवाय करमेना आम्हा कुणा कुणाला…..12

गणपती बाप्पा मोरया मोरया ,पुढल्या वर्षी लवकर या लवकर या…
आनंदाने चला या निरोप देऊया ,आशीर्वाद त्याचा चला घेऊन येऊया….13

आमचे गणपतीबाप्पा गेले हो गावाला ,सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन…
गणपती आमचे आहेत आराध्य दैवत ,आनंदाने सारे राहू मिळून मिसळून….15

बाप्पाचे होता आगमन By सौ.वीणा पाटील| Best Anant Chaturdashi Poem in Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

बाप्पाचे होता आगमन By सौ.वीणा पाटील| Best Anant Chaturdashi Poem in Marathi 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *