काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.संचित कांबळे यांची -गणेशा तुझ्याचसाठी …..- हि कविता -Anant Chaturdashi Status- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
गणेशा तुझ्याचसाठी ….. By श्री.संचित कांबळे | Best Anant Chaturdashi Status 2023
गणेशा तुझ्याचसाठी ….. | Anant Chaturdashi Status 2023

दशावतारी तू प्रथमपूजक
अधिपती तू सकल कलांचा
आगमनाने तुझिया
हर्ष मावेना प्रत्येक जनांचा…
ढोल ताशे अन् नगारे
लेझीमेचा स्वर टिपेचा
कधी मृदंग पखवाजेचा
असे नाद टाळ विणेचा…
आगमनातून खुले मन
आगमनी बहरे सकल जन
आगमनातून वाढी धन
आगमनाने मोहीत तन…
तारणहर तू , विघ्नहर्ता तू
दशदिशांचा मार्गदाता
आमुच्या मनीच्या हृदयबंधना
विश्वाचा तू आवडता…
सांबसदाशिव कृद्ध झाले
पार्वतीच्या नंदना
रूप तुझे निर्माण झाले
लावूनी मुख केले गजवंदना…
पवित्र भाद्रपदाचे महात्म्य थोर
चतुर्थीच्या दिनाचे औचित्य ते
वाजत गाजत होई आगमन
आरतीतून खुले तुज वदन हे…
जास्वंदी पुष्पांच्या छायेमध्ये
हरती देहभान आमुचे
करूनी आरास तुजसाठी
मोहती चक्षू सकलांचे…
मोदकांच्या गोड नैवेद्याने
होसी तृप्त तू आनंदाने
खीर प्रसादाच्या सुवासाने
घरकुले बहरती मोदाने…
डाव्या सोंडेतून करीशी
अन्न ग्रहण अन तोय पान
तुझ्या नावाच्या गोडव्यासाठी
करू आम्ही बेभान नृत्य गान…
पंचपक्वानाचा बेत होई
तुझ्या अस्तित्वाने मधुर
गौराईची भाजी भाकरी लागे
तिच्या स्पर्शाने सुमधूर…
गणनायका, गजवदना, धुम्रवर्णा
वक्रतुंडा, महाकाया
किती घ्यावी तुझी नावे
आमुच्या मनी सदा रहाया…
गणाधिशाच्या सेवेने
बहरती ती शुद्ध मने
करूनी त्याग तप
जाती भावूनी ती क्षणे…
रात्रंदिवसाच्या त्या प्रेमसागरात
आकंठ बुडतो आम्ही
खूप वाढते हृदय तगमग
जाता परत तुम्ही…
पुढच्या वर्षीच्या येण्यात
जाते सहजच हे वर्ष
वाट पाहण्यातच वाढतो
आमुच्या मनीचा हर्ष…
किती लिहावे तुझ्याकरिता बाप्पा
शब्दही लागलेत सांडू
सांग जरासे पुसटसे तू
विघ्न घालवण्या कुणाशी भांडू ?
पंचदिवसांच्या सेवेने तुझ्या
हरवतो आम्ही स्वत:ला
जाशी जेव्हा तू गावाला
चैन कसा पडे आम्हांला?
मांगल्याचे सार तू आणीसी
हर गृहाचे मंदिर करीसी
पाचव्या दिवशी स्वगृही जासी
भक्तगणांना दु:खी करीसी…
बाप्पा तू हरघडी ये
विनायका तू लवकर ये
एकदंता आनंदाने ये
कार्तिक बंधूसवे ये…
पाच दिवस सरले
हुरहूर लागे मनाला
कारण गणपती गेले गावाला
चैन पडेना आम्हांला…
लेखन : संचित कांबळे
कोल्हापूर
संपर्क : ९३०९११४४९२
जन्म दिनांक : १७/०४/१९८२
गणेशा तुझ्याचसाठी ….. By श्री.संचित कांबळे | Best Anant Chaturdashi Status 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
गणेशा तुझ्याचसाठी ….. By श्री.संचित कांबळे | Best Anant Chaturdashi Status 2023
Nice
Good
As always Good Better and Best sir
Good