काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.सुनिता कावसनकर. यांची -गणपती बाप्पा मोरया..- हि कविता -Anant Chaturdashi Var Marathi Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
गणपती बाप्पा मोरया.. By सौ.सुनिता कावसनकर.| Best Anant Chaturdashi Var Marathi Kavita 2023
गणपती बाप्पा मोरया.. | Anant Chaturdashi Var Marathi Kavita 2023

गणपती बाप्पा मोरया..
आला आला गणराया,घेई मन मोदभरे मधूर सुरेल ताना..
धूमधडाक्यात आली स्वारी, गणपती बाप्पा मोरया म्हणा..
बाप्पाचे आगमन होता, वर्षती सुख आनंदाच्या राशी..
सुखकर्ता तु दुखःहर्ता, बाप्पा सर्व संकटे तु हरशी..
घम घम घम घम ,ढोल ताशे वाजती घणाघणा..
धूमधडाक्यात आली स्वारी, गणपती बाप्पा मोरया म्हणा..
तुझ्या दर्शनाने विभोर मन हे, तुंदील तनू हे गजानना..
भावविभोर होऊन आनंदाने, तनमन अर्पूनी करी तव आराधना..
सुंदर करूनी सजावट आरास, मोदक अर्पिती नैवैद्याशी..
करूनी भक्तीभावे आरती, मनोभावे करीती वंदन आशिर्वादाशी..
मनामनाच्या तारा छेडून, एकदंता प्रसन्न होशी भक्तगणा ..
धूमधडाक्यात आली स्वारी, गणपती बाप्पा मोरया म्हणा..
उधळूनी गुलाल नाचे सारे, तनमन भान सारे हरती..
तव आगमनाने सर्वांवर चढते आनंद चैतन्याची स्फुर्ती..
घराघरातून,गावागावातून वसशी तु, होशी प्रसन्न भक्तगणा..
धूमधडाक्यात आली स्वारी, गणपती बाप्पा मोरया म्हणा..
अढळ स्थान तुज ह्रदयामध्ये,आराध्य तु आमचा प्रिय बाप्पा..
सुंदर रुपाने तव मोहित होवून मारिती सारे तुझ्याच गप्पा..
तुझ्याच भोवती रमतो आम्ही , विसरून जातो रे सारे भान….
तुझ्या मुर्तीची सेवा आणि गाती सारे तुझेच गान..
मिठाई, मोदक लाडू सारे भक्तीभावे तुज अर्पिती..
गणपती बाप्पा मोरया म्हणत प्रसादाची गोडी चाखती..
मंगल तू अति मंगलदायक, व्यापून चराचराला उरतो ..
तुझ्या कृपेने तिमिर जावूनी, प्रकाश सभोवती उजळतो..
दहा दिसांचे आगमन गणरायाचे,उधळीत येते चैतन्याला ..
परतुनी का रे जातो लंबोदरा,सोडूनी श्रध्दा भक्तीला ..
पार्थिव गणपती म्हणून विसर्जन करतो,परी न रुचते तव जाणे ..
पुढल्या वर्षी लवकर ये बाप्पा, तुझ्याविना जगी कसे तरणे ..
निरोप घ्यावा कसा ओंकारा, कंठ दाटे पुन्हा पुन्हा ..
वर्ष सरावे कसे गजानना, तुझ्या वीणा उल्हास सुना..
येतो येतो म्हणता म्हणता,आला अन गेलाही तु गणराया..
येई प्रसन्नता घेवूनी तु गजानना, लावी भक्तांसी ममता माया..
बाप्पाच्या कृपेचा महिमा अगाध, दहा दिवस जाई पुर्णत्वाला..
गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हांला..
सौ. सुनिता कावसनकर..
छञपती संभाजीनगर
गणपती बाप्पा मोरया.. By सौ.सुनिता कावसनकर.| Best Anant Chaturdashi Var Marathi Kavita 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
गणपती बाप्पा मोरया.. By सौ.सुनिता कावसनकर.| Best Anant Chaturdashi Var Marathi Kavita 2023
Chan