देशाभिमान वीर जवान | Best army var marathi Kavita in 2024

सौ. संपदा नितीन सोले यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत army var marathi Kavita in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

army var marathi Kavita in 2024

काव्यबंध आयोजित रविवारीय काव्य लतिका स्पर्धा
दि.25/2/2024.
विषय- वीर जवानांसाठी कविता

देशाभिमान वीर जवान | army var marathi Kavita in 2024

देश रक्षणा सज्ज जाहला,
मिळाले मातृसेवेचे बाळकडू
सैनिक हा अभिमान आमुचा,
जोरावर त्यांच्या युद्ध लढू.(१)

ओढ ही असे देशसेवेची,
कथा वीरांच्या त्या स्मरे.
बाळगून अंगी धाडस ,
वीर जवान हा हर्षाने मरे.(२)

पदोपदी देऊन त्या कठीणतम
संघर्षाच्या अविरत परीक्षा .
स्वार्थाविन तो करी प्रेम ,
नसतेच कुठली अपेक्षा.(३)

सेवेची ती करुन प्रतिज्ञा ,
राहतो कायम प्रामाणिक .
देशाची या शान असे तो,
वीरपुरुष योद्धा सैनिक.(४)

अडचणींशी अन् संकटांशी ,
कायम असे त्यांची मैत्री.
आपण जगतो क्षणक्षण ,
त्यांची जगण्याची नसे खात्री.(५)

माय जवानांची अशी,
नयनी अश्रू लपवते .
तोंडावर उसने हसू ,
पाठबळ ती लेकरां देते.(६)

बापही निधड्या छातीचा ,
परी आतून गलबलतो .
खुशी बघून लेकराची,
मरण पुढे तो ढकलतो.(७)

बहीण भावंडांचा तो असे,
चर्चेचा विषय असा खास .
अभिमानाने भरतो ऊर,
वाटेवर डोळे लावती आस.(८)

मित्र अन् गुरुजनांच्या तो
कौतुकात सदैव असतो.
जरी नाही देहानी परी ,
आठवणीत सदा भासतो.(९)

गावकऱ्यांच्या प्रोत्साहनाचे,
तो लढवय्या कारण दिसतो.
क्षणभंगुर तरी ,आनंदी तो ,
मृत्यू त्याचा तारण असतो .(१०)

खरी कमाल ती धर्मपत्नीची,
जाणून देते यज्ञात आहुती .
विरह सख्याचा साहूनही ,
सांभाळते आनंदाने ती नाती.(११)

सत्यमेव जयते हे असे ब्रीद,
कधी न पडे त्याचा विसर.
पाहता त्यांच्याकडे कळे ,
काय असे देशभक्तीचा असर.(१२)

देश हा असे आतून ,
शांत अन् बिनधास्त .
जवानांवरच असते ,
आपल्या सुरक्षेची भिस्त.(१३)

आपल्या परीने देऊया ,
देशासाठी तन-मन-धन .
योद्धांच्या चरणी लीन राहू ,
त्यांचे राहील कायम ऋण.(१४)

सौ. संपदा नितीन सोले पंढरपूर

army var marathi Kavita in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *