Athavan Marathi Kavita | आठवण मराठी कविता Best Marathi Poem

नमस्कार! काल मी घराबाहेर अंगणात येऊन बसले होते. सायंकाळच्या निवांत वातावरणात मला का कुणास ठाऊक जुन्या गोष्टी आठवू लागल्या. आणि असेच एका नंतर एक प्रसंग आठवत मनाची पतंग दूर दूर जाऊ लागली. Athavan Marathi Kavita | आठवण मराठी कविता मला अतिशय जवळची आहे. कारण ह्या जुन्या गोष्टी आठवण्याला आपण आठवण किंवा आठवणी म्हणतो. कधी आनंदी आठवणी असतात तर कधी दुःखी. काही आठवणी तर दोन्हीही नसतात. म्हणजे त्यातून फक्त झालेली घटना आठवते.

ह्याच आठवणींचा मी थोडा विचार केला. काहीवेळ विचार करता करता मला मानवी मनासाठी आठवणी किती वैशिष्ट्य पूर्ण असतात ते कळले. आणि त्यातूनच माझ्यातली कवयित्री जागी झाली. म्हणून मी इथे लिहिल्या आहेत. नक्कीच वाचा ह्या दोन कविता .

Athavan Marathi Kavita | आठवण मराठी कविता

Athavan Marathi Kavita | आठवण मराठी कविता Best Marathi Poem

हृदयाच्या कप्प्यात केली 
भूतकाळाची साठवण…..
शब्दात सांगायचे झालें तर
त्याला आपण म्हणतो आठवण…… 

गतकाळातील अनुभवातून 
मिळते जगण्याची शिकवण…… 
स्वप्नांच्या दुनियेत रमणाऱ्या मनाला 
वास्तवाची जाण करून देते ती आठवण……
 
कधी आनंद, कधी दुःख 
संघर्षमय हे असे जीवन…..
अपयशाने खचलेल्या मनाला 
उभारी देते ती आठवण…… 

परमोच्च आनंदाचे काही क्षण 
जीवनाच्या पुस्कातील सोनेरी पान….. 
आयुष्याच्या संध्याकाळी एकटेपणात 
साथ देते ती आठवण…… 

प्रेमाच्या अन रक्ताच्या नात्याचे 
कुण्या दूर गावी असतात आप्तजन….. 
विरहाच्या दुःखात त्यांच्या 
आधार देते ती आठवण…. 

आयुष्याच्या सागरात 
होते सुखदुःखाची साठवण….. 
शब्दात सांगायचे झालें तर 
त्याला आपण म्हणतो आठवण…… 

Marathi Kavita : तुझी आठवण

Athavan Marathi Kavita | आठवण मराठी कविता

तुझ्या आठवणी मनाच्या पुस्तकात
गुलाबाची फूल बनून राहिल्या
जाई जुईचा गजरा माळून
त्या मलाही फुलवत राहिल्या

कधी कंगनांची किणकिण
कधी पैंजणांची छुमछुम
कधी स्पंदनांचे नाद बनून
मनामध्ये वाजत राहिल्या

त्या आठवणींच्या झुल्यावर
मग मी झुलत राहिले
आकाशी उंच झेप घेता घेता
नभीचे चंद्र तारे वेचत राहिले

कुणास ठाऊक काय झाले
आकाशी त्या मेघ दाटून आले
वादळाच्या त्या वावटळीत
सर्व नादच विरून गेले

आता मी आहे आणि तुझी
आठवण आहे
माझ्या विरक्त जीवनात
तेवढीच आता साठवण आहे

Athavan Marathi Kavita

Author : Shubhangi

Marathi kavita

आमचे इतर लेख वाचा आणि आपले अभिप्राय नक्की कळवा

रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *