ayushyavar charoli kavita in marathi

आयुष्याचे सोने करू आणि आयुष्य वेचतांना | 2 Best ayushyavar charoli kavita in marathi

डॉ. मानसी पाटील आणि सौ. वंदना रमेश ढोले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत ayushyavar charoli kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

ayushyavar charoli kavita in marathi

स्पर्धेसाठी
काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा
दि १/१०/२३
विषय: आयुष्य

आयुष्याचे सोने करू | ayushyavar charoli kavita in marathi

आयुष्याचे सोने करू आणि आयुष्य वेचतांना | 2 Best ayushyavar charoli kavita in marathi

जन्म अन् मृत्यूमधे
एक श्वास उरतसे
जगण्यास माणूस हा
आटापिटा करितसे…..१

आयुष्याचा मध्य येईतो
ऊर फुटेतो धावत सुटतो
तारूण्यावर वार्धक्याचे
सावट येता भानावर‌ येतो….२

आयुष्याच्या मध्यांतर येता
हवं तरी काय असते
तृप्त मन गाभाऱ्यात
एक गाणे गात असते….३

बने क्षणांनी आयुष्य
क्षण वेचित रहावे
आनंदाच्या साऱ्या क्षणी
उमलत बहरावे………..४

शांत निळाईच्या कुशीत
विसाव्याचे क्षण मिळावे
रोज उमलत्या दिवसाचे
दारी कवडसे पसरावे…..५

पूर्ततेच्या आनंदासंगे
नाविन्याची ओळख व्हावी
किलबिलणारी फुलपाखरे
अवतीभवती नाचावी…….६

परमार्थ नी प्रपंच
समतोल हा साधावा
आहे जीवन सुंदर
याचा विसर न‌ व्हावा…….७

सचोटी आणि निष्ठेने
कर्म करीतच जावे
माणसाने माणसाला
आदराने वागवावे……..८

स्मरणात विधात्याला
मनी कायम ठेवावे
त्याने दिलेल्या श्वासाचे
सार्थ जगणे करावे……..९

आयुष्याचे सोने करू
जीवनार्थ गवसावा
छोट्या छोट्या गोष्टीतून
कसा व्यर्थ घालवावा…….१०

©️®️ डॉ मानसी पाटील

ayushyavar charoli kavita in marathi

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
स्पर्धेसाठी
दिनांक:- ०१/१०/२०२३
विषय :- आयुष्य

आयुष्य वेचताना | ayushyavar charoli kavita in marathi

आयुष्य वेचतांना | 2 Best ayushyavar charoli kavita in marathi

आयुष्य जगताना
तसं खूप सोपं असतं..
दुःखातही आनंद
मानण्यात समाधान असतं..||१||

आयुष्य जगताना
कधी रडायचं नसतं…
संकट समोर असताना
कधी झुकायचं नसतं…||२||

आयुष्यात असते
नेहमीच हार जीत..
संकटाला मागे सारून
यशाला आणायचे खेचीत.||३||

आयुष्य असते एक स्पर्धा
आपणच आपल्याशी करण्याची..
प्रयत्नांच्या ओंजळीतून
उद्याची स्वप्ने बघण्याची..||४||

आयुष्य खूप सुंदर आहे
ते आनंदाने जगा…
जगण्यातली गोडी
आनंदाने चाखून बघा..||५||

प्रेम देऊ या, प्रेम घेऊ या
आपल्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगूया..
एकमेकांच्या सुखदुःखात
आनंदाने सामील होऊया.||६||

क्षण आलेला सामोरा
घे रे पूर्णत्वाने जगून…
स्वर्ग नर्क असे इथेच
घे रे सत्य समजून..||७||

सौ. वंदना रमेश ढोले
उरुळी कांचन
पुणे

Best ayushyavar charoli kavita in marathi

ayushyavar charoli kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *