वर्षा पडधान/खोब्रागडे आणि पल्लवी हर्षद यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Ayushyavar Marathi Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
दुनियेची या ऐसी तैसी | Ayushyavar Marathi Kavita

रोज उगवतो सूर्य नवा
अन् रात्र गाई तराणे
तेच तेच जरी रोज रुटीन
पण जगणे होई सुखाने
दुनियेची या ऐसी तैसी
गाऊ जीवनगाणे ।।
चिंता, काळजी रोजचीच
अन् रोज नव्या अडचणी
रोजच्या त्या ठेचा लागून
रोज होत जावे शहाणे
दुनियेची या ऐसी तैसी
गाऊ जीवनगाणे ।।
पाठ फिरवूनी सूख बसले
तरी दुःखाशी गट्टी घालू
लात मारूनी पाणी काढू
आम्ही ऐसे हिम्मतवाणे
दुनियेची या ऐसी तैसी
गाऊ जीवनगाणे ।।
वाट शोधतो नवी नवी
म्हणूनच घडते प्रगती
हात ठेवून हातावर बसती
गंजत जाती कालांतराने
दुनियेची या ऐसी तैसी
गाऊ जीवनगाणे ।।
शोधत बसती आसरा ते
घोळक्यात हरवून जाती
जगास वाट दाखवतील
जे पेटून उठतील जिद्दीने
दुनियेची या ऐसी तैसी
गाऊ जीवनगाणे ।।
वर्षा पडधान/खोब्रागडे
जगन्नाथ नगर
नागपूर
दुनियेची या ऐसी तैसी आणि याला जीवन ऐसे नाव | Best Ayushyavar Marathi Kavita 2023
याला जीवन ऐसे नाव | Ayushyavar Marathi Kavita

आज अचानक माझ्याशी
बोलू लागले मन माझे
म्हणे, सुंदर जीवन दिले असता
काय चालले आहे, सखे तुझे
भेटावयास आलो तुजला
सहज मी बापुडा
दिसलीस तू मज उदास
होईना काही उलगडा
म्हणूनी म्हटले जावे अन्
विचारावे सखे तुजला
काही खुपत असेल तर
सांग म्हणे, त्वरित मजला
अरे वेड्या, माझ्या मना
फिरकी घेसी का तू माझी
तुच सांग, या जीवनी
किती वाहू मी-पणाची ओझी
सोसतही नाही,
बोलवतही नाही
उगा मोठा आव आणिती जन
खरे सांगू, आता पाहवतही नाही
तुकड्या तुकड्यांचे हे जीणे
वाटे सारे निरर्थक
डोळ्यातील ती असूया
करी मना मूक
काय आपुले असे या जगी
सर्वच तर असे त्याचे
साधू, संत असो वा योगी
ताप न सुटले प्रपंचाचे
माया ही मोहक सारी
परि नसे रे त्यात अर्थ
कर्म शुद्ध व चांग करी
अन् साध रे हा परमार्थ
हेच सत्य विसरुनी गेले
जन सारे भूलोकी
मी-पणाचे ढिंडोरे पेटवून
हक्क सांगती मालकी
ऐलतिरी असताना
जाणिव असू दे पैलतीरीची
नेणिवेतही मग धुंद
बासुरी ऐकू येई हरिची
- पल्लवी हर्षद
दुनियेची या ऐसी तैसी आणि याला जीवन ऐसे नाव | Best Ayushyavar Marathi Kavita 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
दुनियेची या ऐसी तैसी आणि याला जीवन ऐसे नाव | Best Ayushyavar Marathi Kavita 2023