Ayushyavar Marathi Poem

जीवन आणि गोड गाणे | Best Ayushyavar Marathi Poem 2023

कु.पूजा मारुती पाटील आणि कु.कशमीरा उल्हास गुप्ते यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Ayushyavar Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

जीवन | Ayushyavar Marathi Poem

Best Ayushyavar Marathi Poem 2023

जीवन म्हणजे सुख : दु:खांनी भरलेला
डोंगर असतो
रोज थोडं-थोडं का होईना तो
रिकामं होतचं असतो

देवानं दिलेंल हे सुंदर जीवन ,आपण असेच
दुःखी घालवत बसायचे नाही
लाख संकटे आली तरीही
मनातून कधी खचून जायचे नाही

जीवन हे कसे आहे हे त्या लोकांना विचारा
कोणाला हाथ नाही ,पाय नाही
घर नाही ,दोन वेळचे जेवण नाही ,
मग ते कसे जगत असतील हे एकदा मनाला विचारा

मनात एक असते ,पण ते बोलण्याचे
कधी सामर्थ्य नसते
कारण आपल्या माणसांसाठी ते करणे
आपले कर्तव्यच असते
दुसऱ्यांसाठी जगता -जगता ,स्वतःसाठी जगणे
मात्र राहूनच जाते

जीवन हे असेच असते ,त्याग समर्पण
हे करावेच लागते
एवढं सगळे होऊनहीं नेहमी चेहऱ्यावर
स्मित हास्य ठेवावे लागते

शेवटी एकट्याने यायचे ,जायचे ही एकट्याने
मग कशाला गर्व ,अहंकार करायचा
प्रत्येक दिवस हा शेवटचा
म्हणून तर जगायचा

कु.पूजा मारुती पाटील
सोलापूर

जीवन आणि गोड गाणे | Best Ayushyavar Marathi Poem 2023

गोड गाणे | Ayushyavar Marathi Poem

जीवन आणि गोड गाणे | Best Ayushyavar Marathi Poem 2023

जीवन गाणे
गातच राहावे
आनंदाने जगावे
असतील जरी
प्रश्न अनेक
संकटे येतील
अनेक रूपांनी
दिसती जीवन दृश्य
आयुष्य हे असेच समजावे

दुःख कष्ट विसरून
जीवन गाणे आनंदाने
गात गात गोड राहणे

जन्म मृत्यू नसे
आपल्या हाती
सगळं गोड मानवावे
प्रेमासारखे राहावे
जिलेबीसारखे जगावे
गोष्टीत तात्पर्य शोधावे
अर्थ जीवनाचा जाणून घ्यावे
जीवन गाणे आनंदाने गावे

आयुष्य हे असेच चालू राहावे
चंद्र तारे असती सोबती
समुद्राच्या लाटा प्रवाह येती
राग लोभ मोह मद मत्सर द्वेष
येती मनात मनातील
दूर हा ठेवूनच
जीवन गाणे गात गावे

एकत्र कुटुंब येऊन
नात्यांचा रंगलेला खेळ
निराळा सुरू असावा
इंद्रधनुष्य रंगते
विविध रंगांनी
तशी नाती रंगावी
जीवन गाणे आनंदाने गावे
सोबत असे नसे
जीवन गाणे गात गावे


नाव. कु.कशमीरा उल्हास गुप्ते डोंबिवली पश्चिम
8828619752 .

जीवन आणि गोड गाणे | Best Ayushyavar Marathi Poem 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

जीवन आणि गोड गाणे | Best Ayushyavar Marathi Poem 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *