baap ani mulgi kavita marathi

दीपस्तंभ | best baap ani mulgi kavita marathi in 2023

डॉ. दक्षा पंडित यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत baap ani mulgi kavita विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

baap ani mulgi kavita

काव्यबंध शब्द समूह
काव्यलतिका स्पर्धा
१५.१०.२०२३
विषय : बाबा
अष्टाक्षरी

दीपस्तंभ | best baap ani mulgi kavita marathi in 2023

दीपस्तंभ आयुष्यात | baap ani mulgi kavita

माझा बाबा,पिता माझा
साधा भोळा सदाशिव
त्याला आप्तेष्टांचा लळा
लावे त्यांच्यावर जिव…….१

पिता मुलांना देतसे
संस्कारांची ही शिदोरी
आयुष्याच्या प्रवासात
नाही कधी शिरजोरी……२

आई बाबांच्या घरात
मुरे स्नेहाचा गोडवा
उभ्या भिंतीत झिरपे
प्रेम मायेचा ओलावा…..३

माझ्या छोट्या घरावर
होते स्नेहाचे छप्पर
असे घरचा उंबरा
सदा स्वागता तत्पर…..४

माझ्या घराच्या दारांना
फुटे दयेचा पाझर
साह्य दुखऱ्या जिवास
बाबा घालती फुंकर……५

बाबा माझा असण्याने
स्फुर्ती मिळे जीवनात
दीपस्तंभ आयुष्यात
स्थान त्यांचे हृदयात……६

थोर त्याचे उपकार
दिला जीवना आकार
सदा सर्वदा पाठिशी
असे सर्वांचा आधार……७

माझ्या जीवनात असे
त्याचे स्थान अनमोल
कृपाछत्र डोईवरी
आशिषाचे घुमे बोल…..८

बाबा जणू सागरात
उभे भक्कम जहाज
वादळांना पचवुनी
कुटुंबाचे सरताज…..९

जीवनात आद्य असे
आई बाबा माझे गुरू
त्यांना करे नमस्कार
क्षणोक्षणी त्यांना स्मरू….१०

डॉ दक्षा पंडित
सँनडियागो, अमेरिका

baap ani mulgi kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *