Baap kavita in marathi

श्रद्धांजली | Best Baap kavita in marathi in 2023

अर्चना कुलकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Baap kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Baap kavita in marathi

काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्यलतिका

विषय: बाबा/वडील

दिनांक: १५/१०/२०२३

श्रद्धांजली | Baap kavita in marathi

बाबा माझे ,दादा सर्व सहृदांचे
पति,बंधु,सुत बिंबच प्रेमरसांचे

मानव रूपी मूर्ती किती पवित्र
मजसाठी पिता , गुरू नी मित्र

रूप देखणे, ते उत्साहाचा झरा
सेवा तत्पर देवमाणूसच खरा

कितीक घडविले नी समर्थ केले
कार्य संपले ते विस्मरणास दिले

विचार केवळ सकारात्मक पाही
थारा कधीही नकार घंटेस नाही

धन संपदा व ऐश्वर्यही दूर जरी
सेवाभावी कोठार आकंठ उरी

उत्तम शिक्षक , लेखक सखाही
कला , निसर्गप्रेमी, राहणी साधी

गीतेतील तो निष्काम कर्मयोगी
देशाप्रति भक्तीभाव दाटले मनी

माय माझी,शक्ती, त्यांची स्फूर्ती
साक्षात लक्ष्मी नारायणाची मूर्ती

पुण्यकर्म त्यांचे, आमच्या कामी
विद्या,धन,संपदा, पुत्रपौत्र नामी

परमेश्वराचे चरणी एक प्रार्थना
पिता जन्मोजन्मी हाच असावा
पिता जन्मोजन्मी हाच असावा

अर्चना कुलकर्णी , ठाणे,

श्रद्धांजली | Best Baap kavita in marathi in 2023

Baap kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह