बाप एक अगम्य हस्ती | baap kavita marathi lyrics

बाप एक अगम्य शक्ती | Best baap kavita marathi lyrics in 2023

सुरेशकुमार जी. शेरे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत baap kavita marathi lyrics विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

baap kavita marathi lyrics

baap kavita marathi lyrics

बाप एक अगम्य हस्ती | baap kavita marathi lyrics
==================

बाप!…..जन्मदाता,सुखदाता,जीवनविधाता!…
कधि कठोर,कधि कोमल
प्रपंच-सरोवरातलं कमल;
बाह्यत: शक्यतो काळाकभिन्न
अंतरी निरामय शुभ्र-धवल!…
जीवनविश्वाचा शाश्वत विश्वास
आपण त्याच्याच श्वासातले श्वास!
असेतो प्रत्यक्ष राहू दिलखुलास
एकदाचा गेला की खेळ खल्लास!…
वाटणे आणि असणे यात असते महद्अंतर
रागामागील लोभ कळतो तो गेल्याच्या नंतर
तेल दिव्यातले सरले तरीही जळते वात निरंतर
वाट दाखवून जगावेगळी
देती तयास अंतर!…..

मावळतीचा सूर्य अचानक निराधार का होतो?
ऊब देवूनी पिंड पोसले
फळ का त्याचे खातो!
मुलाबाळांच्या भवितव्यास्तव
तहहयात पाझरतो
निर्झर असूनी बाप आमचा
असा कसा तो सरतो!…..
परमानुभूती परमपूजनीय
प्रकाशदायी अवर्णनीय
एकमेवाद्वितीय स्थान विश्वसनीय
अंतरी निरंतर विसावा तो रमणीय!…

सुयोग्य, अनुभवी, प्रभावी दिग्दर्शक
परिणामकारक दिव्यत्व निदर्शक
स्वाभिमानी दुर्मिळ पारदर्शक
आतल्याआत अव्यक्त रोमहर्षक!…
कुणास वाटे बापाची धास्ती
कुणाच्या भाग्यात परमदोस्ती
तनमनधनाची तृप्त अशी वस्ती
बाप एक अगम्य हस्ती!

सुरेशकुमार जी. शेरे,
सिंदखेडकर.
ता.माहूर,जि.नांदेड
8605339289.

baap kavita marathi lyrics

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *