baap kavita marathi lyrics

नंदादीप | Best baap kavita marathi lyrics in 2023

सौ. संध्यारजनी बळीराम सावकार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत baap kavita marathi lyrics विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

baap kavita marathi lyrics

स्पर्धा करिता
काव्यबंध समूह
काव्यलातिका
आयोजित रविवार काव्यलेखन स्पर्धा
१५ | १० | २० २ ३

विषय – बाप

नंदादीप | baap kavita marathi lyrics

बाप माझा अनमोल
दाखविली थोर सृष्टी
नंदादीप तेजोमय
अलौकिक कृपादृष्टी .. १

घडविले जीवनात
मार्ग दाखविला सुखी
कष्टातून वाहे घाम
घास आनंदाने मुखी .. २

असे थोर ज्ञानपीठ
आयुष्याचा शिल्पकार
पाठीराखा जीवनात
दिला स्वप्नात आकार . ३

साऱ्या कुटुंबाचा भार
कर्तव्यात असे लक्ष
कल्पतरु सर्वांसाठी
सत्कर्मात सदा दक्ष .. ४

baap kavita marathi lyrics

बाप माझा कणखर
अष्टपैलू व्यक्तिमत्व
ज्ञानदिप तेजोमय
नित्य आदर्शाचे तत्व .. ५

हृदयाच्या कोंडणात
संस्काराचा दिला ठेवा
जीवनात माझ्या सदा
गोड जीभेवर मेवा– ६

वसा दिला सावित्रीचा
प्रकाशाची पायवाट
जीवनाच्या प्रवासात
सदा आनंदाचा थाट .. ७

सदा काळजात असे
बाप आदर्शाचे पान
पानावर कोरल्यात
संस्काराचे मोती शान – ८

त्यांच्या कष्टाच्या वेदना
सलतात हृदयात
नको दागिने संपत्ती
बाप दौलत मनात. ९

रोज घरातच दिसे
मूर्ती पांडुरंग भोळा
चरणात सदा मला
ईश्वराचे रूप डोळा— १०

सौ संध्यारजनी बळीराम सावकार

नंदादीप | Best baap kavita marathi lyrics in 2023

नाशिक

baap kavita marathi lyrics

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *