Baap Kavita Marathi

Baap Kavita Marathi | बापावर अशी कविता शोधून सापडणार नाही

आपण म्हणतो आज सगळीकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे. सर्व महत्वाची पदे, रोजच्या व्यवहारातील शक्तीस्थाने हि पुरुषांकडे असतात. त्यामुळे ते सुखी असतात. सुखी असतीलही पण पुरुषांचे दुःख किंवा कष्ट हे अगदी सामान्य मानले जातात असे दिसते. त्यांना लहानपणा पासून “मुल कुठ रडतात का ?” असं शिकवता शिकवता आपण त्यांच्यातला भावनायुक्त विचार कल्लोळ आतल्या आत दाबतो. आणि “काय झाल मुलगा आहे त्याला कुठे आधाराची इतकी गरज असणार ?” असं म्हणत राहतो. असाच वेळ निघून गेला कि हा मुलगा पुढे वडील होतो. आणि त्याच्या मानसिकतेचे चित्रण होण्या पेक्षा ते लपवण्यात त्याला आनंद मिळू लागतो. तसे पाहाल तर सर्वांनाच आयुष्याच्या अवघड वळणावर आधाराची गरज असते, पण तो कधीच मानसिक आधारासाठी कुणाला बोलत नाही. त्यामुळे मला वाटते बापावर कधीच हवे तेवढे लिहिले जात नाही. तसं लिहिण्याची फार गरज आहे. चला तर मग पाहू या कवी आशु छाया प्रमोद (रावण) याने लिहिलेली बाप वर कविता मराठी / Baap Kavita poem in Marathi

कित्येक कविता लिहिल्या गेल्या आईवर, बापावर एक शब्द लिहिता आला नाही…
आई सापडली मला पुस्तकाच्या पाना-पानांवर, बाप एकाही पानावर दिसला नाही…
सांग माझ्या कवी आणि लेखक मित्रा, बापावर का बरं तू लिहिला नाही…
अरे आईनं तुला नऊ महिने नऊ दिवस गर्भात ठेवलं
पण नऊ महिने नऊ दिवस बापाच्या डोळ्याला डोळा लागला नाही..
अरे मानतो मित्रा मी आईनं तुला जीवन दिलं असेल
पण बापाच्या जीवनाचा एकही दिवस तुझ्याविना गेला नाही…
आईने तुला जन्म दिला आणि म्हणतात ही तिला जन्मदाता
अन् बाप अन्न देत असूनही त्याला अन्नदाता म्हणतांना मी पाहिला नाही…
आई आहे वासराची गाय आहे याचा विसर पडला नाही
पण बापाला लंगड्याचा पाय कुणीही म्हणाला नाही….

बाप वर कविता मराठी / Baap Kavita poem in Marathi

आई बनवते चटणी भाकर तुझ्या पोटासाठी
अन् बाप राबते दिवसरात्र चटणी भाकरी साठी
अन् तू म्हणतोस मित्रा
काय केलं माझ्या बापाने आमच्यासाठी
आई घेते तुला कड्यावर
तिने पाहिलं ते जग दाखविण्यासाठी
अन् बाप तुला खांद्यावर घेते
त्याने पाहिलं नाही ते ही जग तुला दाखविण्यासाठी
आईला ठेवतोस तू निरंतर आपल्या हृद्यापाशी
अन् बाप राहिला फक्त आणि फक्त तुझ्या नावासाठी
तुला जन्म देऊन जीवन दिलं तुझ्या आईने
अन् बापाचा जीवन गेला तुझा नाव जीवनात मोठं करण्यासाठी
आता नाव मोठ्ठं झालं तुझं नी म्हणतोस
काय केलं माझ्या बापाने माझ्यासाठी

बाप वर कविता मराठी / Baap Bap Kavita poem in Marathi

नाही रे मित्रा तु जो समजतोस बापाला तेवढं पुरेसा नाही
बापाला समजायला हा एकच जन्म पुरेसा नाही
बाप गेल्यावरच म्हणशील मग मित्रा
बाबा का तू अजून आमच्यासाठी जगलास नाही

बाप वर कविता मराठी / Baap Bap Kavita poem in Marathi

अरे बाप गेल्यावर च कळते बापाची किंमत काय असते
जिवंतपणी तो कधीच कुणाला कळणार नाही
अन् मी म्हणतो मित्रा
बापाची जागा आई कधीच घेऊ शकणार नाही
बाप हा बाप च असतो
त्याला जन्मभर तुझी आई होता येणार नाही
पण खरं सांगतो मित्रा
सात जन्म ही तुझ्या आई ला बाप होता येणार नाही

बाप वर कविता मराठी / Baap Bap Kavita poem in Marathi

मी असं म्हणत नाही मित्रा तुझ्या आईची या जगात काहीच किंमत नाही
तिचे उपकार तू जन्मभर फेडू शकणार नाही
पण बापाची किंमत एवढी आहे या जगात
की त्याचे उपकार तू सात जन्म ही फेडू शकणार नाही

म्हणून मी म्हणतो आईला जेवढी किंमत देतोस मित्रा
तेवढीच बापाला ही देत जा
तू लिही आईवर एक कविता संग्रह
पण कविता संग्रहात एक पण बापासाठी ठेवत जा
नको लिहू मोठ मोठ्या कविता
कमीत कमी दोन शब्द बापावरही लिहत जा…..

कवी आशु छाया प्रमोद (रावण)

आशु छाया प्रमोद (रावण)

तुम्हाला आमची आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा>>>>.

रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा>>>>.

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *