baap poem in marathi

बाबा माझा आधार | Best baap poem in marathi in 2023

कु. प्रणाली ओमप्रकाश चौधरी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत baap poem in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

baap poem in marathi

स्पर्धेसाठी
काव्य बंद समूह काव्य लतिका आयोजित काव्य स्पर्धा
दिनांक 15 ऑक्टोबर 2023
विषय:- वडील

बाबा माझा आधार | baap poem in marathi

प्रिय बाबा… “बाबा” तुम्ही किती कष्ट केलेत तुमच्या या लेकरांसाठी ,
जबाबदारीच्या ओझ्यात तुम्ही किती झटलास सर्वांसाठी.

“तुमच्या स्वप्नांना बाजूला करून तुझ्या लेकरांची जिद्द पुरवली,
बाबा तुम्हांलाही तुमच्या स्वारांची आठवण नाही का आली.

हसावे रुसावे किती आयुष्याशी सांगड घालावी तरी कशी,
अश्या प्रत्येक मार्गाची वाट तुम्ही मला दाखवली….

काय कराव काय नाही काय योग्य-अयोग्य,
आयुष्याच्या या खडतर वाटेवर बाबा तुमचीच तर साथ मला लाभली….

लेखन पाटी घेऊन लिहिताना बाबा तुम्हीच तर मला शाई पुरवली,
तुमच्यामुळेच तर आज बोलण्याची प्रेरणा मिळाली…..

दमले होते जेव्हा मी या आयुष्याला पाहून,
तेव्हा धीर देऊन बाबा तुम्हीच तर घेतले सांभाळून….

‘बाबा’तुम्ही बनलास, माझ्या आयुष्याचा पाया
दिलीत तुम्ही मनापासून आईसारखी माया….

संकटाना सामोरे जाण्याचा सहारा दिला,
खडतर प्रवासांना भिडण्याचा आधारही दिला….

“बाबा तुम्हांमुळे अर्थ या जिवनाला आता,
तुमच्यामुळेच तर जगण्याला अर्थ मिळाला…….

“नवीन जग पाहण्याचा मार्ग बाबा तुम्ही दाखविला ,
निस्वार्थी या जगात मला बाबा फक्त तुझ्यात देव दिसला..’

कु. प्रणाली ओमप्रकाश चौधरी
वाशिम, महाराष्ट्र

बाबा माझा आधार | Best baap poem in marathi in 2023

baap poem in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *