Baba kavita in marathi

जलाशय | best Baba kavita in marathi in 2023

विद्या प्रधान यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Baba kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Baba kavita in marathi

काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका
रविवार ची स्पर्धा

स्पर्धेसाठी स्वरचित कविता

१५/१०/२०२३

विषय:- बाप.

जलाशय | Baba kavita in marathi

अष्टपैलू व्यक्तिमत्व
कर्तव्यात दक्ष राही
व्यवहार रोखठोक
जमाखर्च स्वतः पाही. १

नसे सोसत अन्याय
न्यायासाठी तळमळ
क्रोध होतो अनावर
येई देहातचि बळ. २

देई मदतीचा हात
गरीबांना हातभार
मुले त्यांची शिकण्यास
खटपट करी फार.

बाप मुलीचा हळवा
दु:ख अपार सोसतो
वरवर आनंदात
उरी वेदना झेलतो. ४

बाप नावाचं जहाज
हेलकावे खात खात
अडचणी निभावतं
कष्ट करी दिस रात.

रागावून ओरडतो
देई क्षणात आधार
प्रेम असे मुलांवर
आनंदीत परिवार .

कुटुंबास सांभाळून
संकटात सावरतो
नसे बोलून दाखवी
झगडून निभावतो.

घरातील औषधांना
देई प्राधान्य अपार
पैसा जपून ठेवतो
सदा अपत्य विचार.

लेक जाता सासरला
जलाशय नयनात
गळा हूंदके दाटती
धडधड हृदयात. ९

छत्र पित्याचे सदैव
नित्य राहो डोईवर
बोधप्रद उपदेश
गाठू यशाचे शिखर.
१०

विद्या प्रधान
ठाणे.

जलाशय | best Baba kavita in marathi in 2023

Baba kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *