baba kavita in marathi lyrics

बाबा गेल्यावर | best baba kavita in marathi lyrics in 2024

सौ. वंदना रमेश ढोले यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत baba kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

baba kavita in marathi

काव्यबंध समूह आयोजित

काव्यलतिका स्पर्धा

स्पर्धेसाठी

दिनांक:- १५/१०/२०२३

विषय :- बाबा

बाबा गेल्यावर | baba kavita in marathi

ज्याला नाहीत बाबा त्याला
विचारा त्यांची पोकळी…
बाबांची जागा आयुष्यभर
तशीच राहते मोकळी..||१||

खूप घाव सोसले तुम्ही
ते विसरता येत नाही….
बाबां इतकं सुख आयुष्यात
दुसरं कुणीच देत नाही ||२||

तुमचं अचानक जाणं
मनाला हुरहूर लावून गेलं…
मनातलं सारं दुःख
डोळ्यात येऊन थांबलं..||३||

तुम्ही होतात माझे बाबा
लेक मी तुमची…
तुमच्यापासून दूर राहताना
घालमेल होते जीवाची..||५||

गेलात जरी सोडून बाबा तुम्ही
आठवणींनी डोळ्यात पाणी तरारते..
सुखाच्या प्रत्येक क्षणी
उणीव मात्र तुमची भासते…||६||

तुमच्या मागे आईने दिला
खंबीरपणे आम्हा आधार..
स्वतःचे दुःख बाजूला ठेऊन
दिला आमच्या जीवनाला आकार..||७||

आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत
आठवण तुमची येत राहील..
तुमच्या संस्कारात वाढलेली मी
सतत तुमची ऋणी राहील..||८||

केलेत माझ्यावर संस्कार
त्याच संस्कारावर चालत राहील…
करुनी अपार कष्ट
स्वप्ने तुमची साकार करील…||९||

सौ वंदना रमेश ढोले
उरुळी कांचन, पुणे.

baba kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *