baba kavita in marathi language

सुपर हिरो बाबा | Best baba kavita in marathi language in 2023

सौ. स्वरूपा कुलकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत baba kavita in marathi language विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

baba kavita in marathi language

स्पर्धा करीता
काव्यबंध समूह
काव्यलतिका
आयोजित रविवार काव्यलेखन स्पर्धा

विषय = बाबा

सूपर हिरो बाबा baba kavita in marathi language

बाबा असतो मुलांचा आवडता सुपर हिरो न्यारा,
जीवनभर जगतो फक्त मुलांसाठीच खरा…

तो आणि मुले दंगा करतात घरी खूप,
आई म्हणते बाबाला बस झाली धुडगूस…

बाबा रंगात आला की कॅरमही आवडतो खूप,
कारमध्ये फिरवतांना हसवतो भरपूर..

बाबाला नी मला आवडते पाणीपुरी भारी,
तो वळवतो गाडी तिकडे नी मजा येते खरी…

त्याला असते नेहमी काम ऑफिसचे जास्त,
पण म्हणून नाही चुकवली कधी रात्रीची गोष्ट…

त्याला आवडतात गाणी नी पिक्चर जुने नवे,
मीही ऐकत रहातो लता रफीचे तराणे….

तो किती जगतो भरभरून आमच्यासोबत,
मजा येते त्याच्या गप्पात सगळं वाटतं सोप्पं…

तो कितीही मोठा वयाने पण मारत नाही कधिही,
म्हणून पिल्लं आम्ही त्याला मानतो नेहमी…

त्याची नी आमची नाळ बाप लेकरांची,
जणू बाबा भासतो मला देवाचाच दूत भारी..

सौ.स्वरूपा कुलकर्णी,
राहाता,अहमदनगर

सुपर हिरो बाबा | Best baba kavita in marathi language in 2023

baba kavita in marathi language

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह