baba kavita in marathi

बाबा | Best baba kavita in marathi in 2023

अनुया काळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत baba kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

baba kavita in marathi

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका साप्ताहिक उपक्रम
दि.१५/१०/२०२३

बाबा | baba kavita in marathi

बाप विशाल विशाल
बाप मायेची पखाल
मानसन्मानाची उंची
बाप भरजरी शाल

बाप माया नि दरारा
बाप गूढ हसणारा
भरलेल्या लेकीसाठी
बाप जागता पहारा

बाप फणसाचा गरा
बाप तळपता तारा
लाडक्या ग लेकीसाठी
बाप लाखातला हिरा

बाबा नका मला धाडू
तिकडे त्या दूरदेशी
डोळाभेट घेईन मी
पूर्ण कराल असोशी

घमघमीत केवडा
बाप चंदन मोगरा
बाप अबोलसा चाफा
बाप हळवा गहिरा

अंतरात ममतेचा
झरा अखंड वाहतो
जीवनात विचारात
बाप माझ्यात वसतो

तेच निरागस हसू
नाही कधी मावळत
संयमाचा महामेरू
तळपतो अखंडित

फार नाही केले पुण्य
नाही कमावले धन
आभाळाहूनही मोठं
माझ्या बापाचं हो मन

साऱ्या मुक्या भावनांचा
होतो मनात कल्लोळ
येता आठवांना पूर
कसं आवरावं डोळं.

_अनुया काळे
मुरबाड ठाणे

बाबा | Best baba kavita in marathi in 2023

baba kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह