तू पाहिजे होता रे अजून | Best baba marathi kavita for father in 2023

तू पाहिजे होता रे अजून | Best baba marathi kavita for father in 2023

प्रा. शरदचंद्र काकडेदेशमुख यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत baba marathi kavita for father विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

baba marathi kavita for father

. काव्यबंध समूह आयोजित

  • काव्यलतिका

दिनांक. १५ /१० /२०२३
विषय.. वडील/बाबा

baba marathi kavita for father

तू पाहिजे होतास रे अजून | baba marathi kavita for father

तुझ्या नसण्याने मन गेलय थिजून..
“बाबा ” खरच तू पाहिजे होतास रे अजून
.
सांगितलय मला आईने ,माझ्या जन्माचा दिवस
तू निष्णाबाईला , हात जोडून केलेला नवस .
हे बी सांगितलय गावात साखर वाटत फिरलास
कधी नव्हे ते देवादिकांचा पाय धरलास .

तुझ्या मारातही स्पर्श होता रे मायेचा ,
आधार होता ,वटवृक्षासम छायेचा .
सुन्न झाल्या दशदिशा काय करु सजून ,
” बाबा “खरच तू पाहिजे होतास रे अजून .

संस्कार, त्याग ,निष्ठा भरभरून दिली “शिदोरी “
वाटेवर जीवनाच्या,प्रतिष्ठा घरी आणि दारी .
केलस आम्हा ,सबल,ज्ञानसंपन्न स्वःता झिजून,
. “बाबा ” खरच तू पाहिजे होतास रे अजून

भावनांच्या ओंजळी केल्या तुझ्यापुढे रित्या ,
फक्त एकदाच ये पुनश्च फिरुनी ,जन्मदात्या .
झालय कितीदातरी विधात्याला भजून ,
“बाबा ” खरच तू पाहिजे होतास रे अजून

साथ लाभली रे ,मनापासून फक्त तुझी ,
साकार झाले पहिले आत्मचरित्र “शिदोरी “माझी.
आठवण येते रे तुझी पापण्या ,गेल्या भिजून ,
“बाबा “खरच तू पाहिजे होतास रे अजून.
“बाबा “खरच तू पाहीजे होतास रे अजून .

प्रा, शरदचंद्र काकडेदेशमुख
,पुरंदर,जि.पुणें
९४२२३०४०५५

baba marathi kavita for father

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *