baba var kavita in marathi

बाप : एक तळमळ | Best baba var kavita in marathi in 2023

सौ. भारती गाडगिलवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत baba var kavita in marathiविषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

baba var kavita in marathi

स्पर्धेसाठी
काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
दि : १५/१०/२३
विषय : बाप

बाप : एक तळमळ | baba var kavita in marathi

बाप…!
दोन अक्षरी शब्दात…!
सामावते लेकरांचे विश्व सार…!
बाप एक आधारवड….!
बाप म्हणजे ग्रीष्मातील शितल फुंकर….!


कुटुंबप्रमुख, वाटाड्या, मार्गदर्शक नावं देऊ तरी किती…!
कधी वज्रासम भासते तव मूर्ती…!
कधी फणसाच्या गरासारखी….!
ठेवी सदैव मुखी कठोरता आव….!
प्रसंगानुरूप बदलती भाव…!
लेकरांमध्ये सदा गुंतला त्याचा जीव…!


कुटुंबाला जपतो…!
हवं नको ते बघतो…!
तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलांना जपतो…!
त्यांच्या स्वप्नांना बळ देतो…!
मुलांवर संकटं ओढवता कासावीस होतो…!
वरवर खंबीर असला तरीही आतुन तळमळत असतो…!
ओढुनी धैर्याची चादर ढाल बनतो लेकरांच्या संकट काळात…!
प्रसंगी जीव ओतून झुंज देतो असाध्य घटना घडताना….!
बापा तुझी नवलाई विस्तारण्या शब्दही कमी पडती इतकी तुझ्या कष्टाची पुण्याई….!
बापाच्या वेदना, तळमळ समजण्या बाप व्हावं लागतं हेच खरं…!!

सौ. भारती गाडगिलवार, चंद्रपूर

बाप : एक तळमळ | Best baba var kavita in marathi in 2023

baba var kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह