माझे बाबा | Best baba var kavita marathi madhe in 2023

अनिता बर्गे भोसले यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत baba var kavita marathi madhe विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

baba var kavita marathi madhe

काव्यवबंध समूह आयोजित काव्य लतिका
15/10/2023
विषय – बाबा/ वडील

माझे बाबा | baba var kavita marathi madhe

करुनी पोरकी सान सानुली,
अचानक निघुनी का गेला
सांग ना आई
का ग मजला सोडूनी बाबा गेला.

आठवतो ग आई मजला,
बाबांचा तो चेहरा हसरा.
तो ही आवडला का देवाला
मला सांग ना.
त्यांना न्यायची त्याला का झाली होती घाई,
देव आहे ना तू
तुला माझं काहीच कसं वाटलं नाही.

कुशीत त्यांच्या झोपायचे
राहूनच गेले,
अन् कुशीतल्या गोष्टी ऐकायचे
आता स्वप्न सुध्दा विरून गेले.
का देवा असा तू निष्ठुर वागलास,
बाबाच्या मायेला मला
पोरकी करून
माझ्या नशिबाला फक्त हसत राहिलास.

माझ्या शाळेतील गमतीजमती
आता कुणा मी सांगू?
पाठीवरती खंबीर मायेचा हात
आता कुठे मी शोधू?
आईची कुशी आहे रे देवा
मला सावरायला
पण बाबाचा मायेचा आधार
आता मी कुठून घेऊ.

बाबा गेल्याचं दुःख
नाही रे झेपवत या बालमनाला,
साऱ्या खेळण्यापुढे
आमचा बाबाच प्रिय असतो आम्हाला.

करायचं असलं तर एक कर देवा
आम्हा लेकरापासून बाबा असा
अवचित हिराऊ नकोस देवा.
आम्हा लेकरापासून बाबा असा
अवचित हिराऊ नकोस देवा.
अस नको होत करायला देवा
का माझ्या बाबंचापण तुला वाटला होता हेवा.

अनिता बर्गे भोसले
सातारा

माझे बाबा | Best baba var kavita marathi madhe in 2023

baba var kavita marathi madhe

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह