bap kavita in marathi

तुम्ही नसतानाच जगणं खरच खूप असह्य आहे हो | Best bap kavita in marathi in 2023

रोशनी लक्ष्मी सुंदरलाल फुलझेले यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत bap kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

bap kavita in marathi

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका..
दिनांक:-१५/१०/२०२३
विषय:-बाबा/वडील….

तुम्ही नसतानाच जगणं खरच खूप असह्य आहे हो | bap kavita in marathi

अस म्हणतात,, की चालताना पायाला ठेच लागली
की चटकन ” आई..ग ” अशीच हाक बाहेर येते.. पण समोर भल मोठं संकट उभं ठाकल की ” बापरे” असाच शब्द ओठांवर येतो..
म्हणजे आई आणि बाप दोघेही तितकेच महत्वाचे…
पण दुर्दैवाने एखादं संकट आलच तरीही वेदना तितक्याच होतात जेवढा हा विचार करून होतात की त्या संकटांना दोन हात करण्याची हिंमत देणारा एक ( बाप ) नावाचा आधारच माझ्या आयुष्यात नाहीये…😢

पण नाही ह बाबा ही माझी तक्रार नाहीये
हे सगळं बोलताना मी सहानुभूती मिळावी या आशेने बोलत नाहीचे..
तस जगणं आजतागायत कधी जमलही नाही आणि तुमच्या अपरोक्ष आई ने ही कधी तसे संस्कार केले नाहीत.
तिने तर शिकवल बाणेदार पणे जगायला…

bap kavita in marathi

ज्यावेळी तुमचा आधार सुटला
त्या क्षणी नक्की काय घडतय हे कळायचं नाही, कारण नेमकीच तुमच्या अंगा- खांद्यावर खेळायला लागले होते ना हो मी,,
माझे इवलेसे हात तुम्हा दोघांच्या बोटांच्या चिमटीत बसवून स्वप्न पाहायला लागले होते भविष्याचे कदाचित…
हा…पण एवढं मात्र कळलं होतं…
की जे सुटतय न हातातून ते आता परत कधीच मिळणार नाहीये
मग काय आकांत आणि आक्रोश नुसता….!

bap kavita in marathi

मला तुमचा चेहरा नाही आठवत
पण काही क्षण आठवतात धूसर असे…
बाप म्हणजे जगण्याचं माप आहे
मायेन फिरवलेली पाठीवरली थाप आहे..
ध्येयाकडे नेणारी मजबूत अशी शिडी आहे
संकटातून पार करणारी विश्वासार्ह होडी आहे..
पण हे सगळे अनुभव घेण्याआधीच माझा हात सोडून निघून गेलात..
याची खंत आयुष्यभर न मिटणारी आहे..

पण तुमच्या पाठमोरी तुमची जबाबदारी आई ने अगदी चोख पार पाडली बर का …!
तिच्या परीनं तिने ते सर्व काही दिल जे एक बापच करू शकतो…
तुमच्याशिवाय जगणं तिच्यासाठी अग्नीदिव्यातून जाण्यापेक्षा काही कमी न्हवत..वयाच्या केवळ पंचविशीत नवऱ्याची साथ सुटणं, कडेवर लहानशी पोर घेऊन सासर सोडण..अन त्यात उभं आयुष्य विकृत वृत्तीच्या माणसापासून जीव मुठीत घेऊन दिवस काढणं
हे एक महाभयंकर अग्निदिव्यच..

आणि तितकीच तारेवरची कसरत करत मला वाढवण, घडवणं एक सुंदर माणूस बनवणं स्वतःच्या पायावर उभं करणं.. हे फक्त तीच करू शकते त्यामुळे तिच्या कर्तृत्त्वाला साष्टांग दंडवतच👏🏻👏🏻
मला कायम असच वाटत की तुम्ही
जिवंत आहात आई च्या रूपाने
आणि आई अस म्हणते की तुम्ही जिवंत आहात माझ्या रूपाने…
शेवटी काय आता असच जगणं आहे आम्हाला एकमेकींच्या आधाराने…

आज परत अस वाटून गेलं खरच तुम्ही असायला हवे होतात…
पण जिथे आहात तिथे सुखी राहा
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

वडिलांचा फोटो नाहीये मजजवळ
त्यामूळे आईचा फोटो लावला तर चालेल का ??.. नसेल चालत तर काढून टाकला तरी चालेल.. माझी आईच माझा बाप आहे👏🏻👏🏻👏🏻

रोशनी लक्ष्मी सुंदरलाल फुलझेले
यवतमाळ

तुम्ही नसतानाच जगणं खरच खूप असह्य आहे हो | bap kavita in marathi in 2023

bap kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह