मनुष्यातील देव | bap kavita lyrics

मनुष्यातील देव | Best bap kavita lyrics In 2023

प्रा. महेश कृष्णा पगार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत bap kavita lyrics विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

bap kavita lyrics

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका

दिनांक :15/10/2023

विषय – वडील / बाबा

bap kavita lyrics

मनुष्यातील देव | bap kavita lyrics

आई असते चपाती आणि बाप असतो संसाराची भाजी
आईबाप हीच आयुष्यातील पुण्याई माझी
आई असते मायेचा सागर अन बाप वात्सल्याची घागर
शेतामध्ये काम करून बापाच्या शरीरातून निघतो घामाचा पाझर
भावाने काही उद्योग केले की बापालाच येतो राग, मग तो भावाच्या कानाखालीच काढतो आग आणि म्हणतो “जरा अदबीनं वाग.”


जगाची ही किमया न्यारी आईसाठी गाती ओव्या
बाप कितीही असो चांगला, शेवटी बापच खातो शिव्या
माझा बाप आहे म्हणतात खूपच तापट
कसे सहन करणार चुकीचं, म्हटल्यावर तो मारतो चापट
पण बाप आहे माझा वाहत राहणारा प्रेमाचा झरा
चापट मारल्यावर पण म्हणतो लागले नाही ना पोरा?
बाप बाप म्हणजे काय असते हो?
आपल्या घरातल्या संसाराचे चलते फिरते माप असते हो.
माझ्या देवाची ही किमया न्यारी
म्हणून म्हणावेच लागेल, माझा बाप लय भारी…

प्रा. महेश कृष्णा पगार

bap kavita lyrics

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *