bap lek kavita in marathi

मुलीचा बाप | Best bap lek kavita in marathi in 2023

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत bap lek kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

bap lek kavita in marathi

काव्यबंध समूह आयोजित

काव्यलतिका
लक्ष रविवारी. होणारी स्पर्धा
दिनांक १५/१०/२०२३
विषय. …बाप

मुलीचा बाप | bap lek kavita in marathi

मुलीचा तो बाप असतो
दयाळू आणि मायाळू
मुलगीही त्यांच्यासाठी
खरंच असते. कनवाळू ….१

बाप फिरतो दारोदार
मुलगी झाली उपवर
मुलीच्या लग्नासाठी
शोधतो निर्व्यसनी वर….२

मुलगी झाल्यावर पसंत
बापाचं काळीज धडधडतं
उडून जाणार चिमणी आता
मनातल्या मनात अडखळतं…३

घरातला थांबेल चिवचिवाट
आठवणी राहतील इथं
रमेल ती तिच्या माणसात
विचारानेच काहूर मा जतन …४

कोण म्हणेल मला आता
औषध गोळ्या घेतल्या का
नका जाऊ बाहेर उगीचच
कामाला विराम देताल का ….५

मुलगी आपली आहे खरी
धन मात्र दुस-याचं असतं
हेच सारे आठवून तो बाप
बापाचं काळीज चिरत जातं …६

गेली निघून छकुली , सासरी
ओढ लागते त्याच्या जीवाला
दगड ठेवून छातीवरती जातो
मुलीला सासरी उगी भेटायला …७

बघतो खिशात दोन चार पैसे
खाऊ घेण्यासाठी लाडलीला
हळूच राम राम करुन बसतो
ईवाई, जावयी, त्या मंडलीला ..८

जयद्रथ आखाडे
जिल्हा पुणे

मुलीचा बाप | Best bap lek kavita in marathi in 2023

bap lek kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *