Batata Vada Recipe in Marathi

Batata Vada Recipe in Marathi | हॉटेलच्या पद्धतीने खुसखुशीत बटाटा वडे

‘बटाटा वडा’ हा कोणत्याही ऋतूमध्ये अगदी आवडीने खाल्ला जातो. ‘आलू बोंडा’ असे काही ठिकाणी बटाटा वड्याला म्हटले जाते. बटाटा वडा आणि चहा हे समीकरण तसे जुनेच आहे. हॉटेलच्या पद्धतीने तुम्हीदेखील घरी सहजपणे खुसखुशीत आणि कुरकुरीत ‘बटाटे वडे’ तयार करू शकता.
Batata Vada Recipe in Marathi recipe for of Batata Vada

तर मग जाणून घेऊयात बटाटा वड्याची अगदी सोपी अशी रेसिपी.

महत्त्वाचे साहित्य :

२ कप चण्याच्या डाळीचे पीठ.
३ चमचे तांदळाचे पीठ.
आवश्यक तेवढे मीठ
१ चमचा मोहरीच्या बिया.

Batata Vada Recipe in Marathi

६ ते ७ हिरव्या मिरच्या
२ चमचे कोथिंबीर
४ मध्यम आकाराचे बटाटे
आवश्यक तेवढी हळद
१ चमचा लाल मिरची पावडर
१ कप पाणी.
चवीनुसार लिंबू रस ,चिमूटभर हिंग
२ चमचे वापरातील तेल

कृती :

१ : Batata Vada साठी बटाटे स्मॅश करा.

बटाटे स्वच्छ धुवून घेऊन कुकर मध्ये उकडून घ्या . एका भांड्यामध्ये त्याचे साल काढून स्मॅश करा.

२ : बटाटा वाद्यासाठी फोडणी द्या.

कढईमधे तेल गरम करायला ठेवा. त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या ,हिंग, आणि चवीनुसार मीठ हे सगळे जिन्नस घेऊन मिक्स करा. सगळी सामग्री दोन मिनिटांसाठी चांगली फ्राय करा.

Batata Vada Recipe in Marathi | हॉटेलच्या पद्धतीने खुसखुशीत बटाटा वडे

३ : फोडणी घातलेली सगळी सामग्री स्मॅश केलेल्या Batata Vada मध्ये मिक्स करा.

फोडणी घातलेली सामग्री स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करा. त्यामध्ये हळद आणि बारीक चिरलेली कोंथिबीर टाका. चवीनुसार मीठ घालावे. सगळी सामग्री एकजीव केल्यानंतर लहान – लहान आकाराचे वडे तयार करून घ्या. हे वडे बाजूला ठेवा .

Batata Vada साठीचे पीठ.

एका भांड्यामधे डाळीचे पीठ , तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद आणि लाल तिखट एकत्र करून घ्या . यामध्ये पाणी ओतून सगळे साहित्य चांगले मिक्स करा. पिठामध्ये गाठी तयार होऊ देऊ नका . दोन चमचे गरम तेल त्यामध्ये मिक्स करा. त्यामुळे वडे क्रिस्पी होतात.

Batata Vada Recipe in Marathi

५ : बटाटे वडे तेलात फ्राय करा.

बटाट्याचे वडे बेसनच्या पिठात बुडवून तेलामध्ये मध्यम आचेवर तळून घ्या. वडे चांगल्या पद्धतीने डीप फ्राय करा.

६ : गरमागरम वड्यांचा आस्वाद घ्या.

चिंचेची चटणी किंवा सॉस या सोबत तुम्ही बटाटा वड्यांचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकता.

Batata Vada Recipe in Marathi

तुम्हाला आमची आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा>>>>.

रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा>>>>.

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *