काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.शितल बाविस्कर राणेराजपूत यांची -मैत्रीच्या पलीकडे – हि कविता -Best Maitri Kavita In Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
मैत्रीच्या पलीकडे By सौ.शितल बाविस्कर राणेराजपूत | Best Maitri Kavita In Marathi 2023
मैत्रीच्या पलीकडे Best Maitri Kavita In Marathi 2023

तुझी आणि माझी मैत्री
असे नेहमी अमूल्य ठेवा
निरपेक्ष भावना मनी
नसे कोणताही हेवा ||१||
प्रत्येक सुखदुःखात
असते माझ्या सोबतीला
नजर न लागो कधी
आमच्या घट्ट मैत्रीला ||२||
माझी जिवलग मैत्रीण
आहे ती खूपच गोड
मनमिळाऊ स्वभाव
उत्तम गुणांची जोड ||३||
मन:स्थिती ढासळता
धीर देऊन सावरते
सहवास तिचा लाभता
मन आनंदे बागडते ||४||
गुंफण मैत्रीच्या नात्याची
अशीच कायम राहावी
धागा जोडून मैत्रीचा
साथ नेहमी लाभावी ||५||
तुझ्या सहवासाने व्हावी
नित्य आनंदाची उधळण
जपून ठेवावे सदोदित
उत्साही आनंदाचे क्षण ||६||
बंध आपल्या मैत्रीचे
हृदयातील कप्प्यात
कोरून ठेवलेले माझ्या
आयुष्यात प्रत्येक श्वासात ||७||
तुझ्या अनमोल शब्दांनी
आयुष्य माझे घडवले
माझ्या निरस जीवनात
नवे रंग प्रिये तूच पेरले ||८||
सात जन्माचे देऊन
वचन नातं बहरले
सुख आणि समृद्धीचे
दान ओंजळीत टाकले ||९||
मैत्री आणि प्रेम यातील
गोडवा जपून ठेवला
तुझ्या सोबतीने अर्थ
प्रीतीचा मला उमगला ||१०||
दोघांचे नाते असेच
नित्य बहरत राहावे
मैत्रीच्या या नात्यात
जीवन समृद्ध व्हावे ||११||
माझ्या आयुष्यात नेहमी
तुझे स्थान असेच राहिलं
आपल्या मैत्रीसाठी माझं
संपूर्ण आयुष्य मी वाहिलं ||१२||
या मैत्रीदिनाला देतो
प्रीत काव्यातून ग्वाही
तुझ्याशिवाय जीवन
माझे अपूर्णचं राही ||१३||
तुझी साथ लाभल्याने
ठरलो मी भाग्यवान
मैत्रीच्या या गोडव्यात
संसार फुलला छान ||१४||
मैत्री ही अशीच असते
जीवाला जीव देणारी
अडचणीत सदा धावून
आयुष्य पैलतीरी नेणारी ||१५||
मैत्रीचा गंध जीवनात
सदा दरवळत राहतो
खऱ्या मित्राला मनातील
भाव न सांगता कळतो ||१६||
फक्त निरपेक्ष भाव असता
मनात चिरकाल टिकते
भावनांच्या पलीकडे
अबोल भाव मैत्री टिपते ||१७||
आजही आपल्या सोबतीचे
क्षण मनास आनंद देतात
गोड आठवणींनी माझ्या
जीवनाला परिपूर्ण करतात ||१८||
नित्य अशीच राहावी जवळ
नको सोडूस माझी साथ
दिव्याला सोबतीला असे
जशी प्रकाशाची ज्योत ||१९||
तुझ्या कौतुकासाठी प्रिये
शब्द मज अपुरे पडतील
आपल्या मैत्रीची साक्ष
चंद्र तारेही नित्य देतील ||२०||
शितल बाविस्कर राणेराजपूत जळगाव

मैत्रीच्या पलीकडे By सौ.शितल बाविस्कर राणेराजपूत | Best Best Maitri Kavita In Marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
मैत्रीच्या पलीकडे By सौ.शितल बाविस्कर राणेराजपूत | Best Best Maitri Kavita In Marathi 2023
खूपच सुरेख कविता लिहिली आहे मैत्रीवर👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🌹
खुपच भावस्पर्शी…..असेच छान लिहीत रहा….
खूपच छान
अप्रतिम शब्दांकन काळजाला भिडणारी तुझ्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा