Paus Marathi Kavita

पावसाच्या आठवणीने | पावसाळा आणि आठवणी | Best Paus Marathi Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी Sandip Dhiwaruji Gaikwad यांची -पावसाच्या आठवणीने- हि कविता -पावसाळा आणि आठवणी- या विषयावर असून हि एक Paus Marathi Kavita आहे

पावसाच्या आठवणीने | Best Paus Marathi Kavita 2023

पावसाच्या आठवणीने | पावसाळा आणि आठवणी | Best Paus Marathi Kavita 2023

मेघ भरून आलं
सुटलं सुसाट वारं
हेलकावे देते नावं
चिंब भिजत रानं..

पाऊस कधीचा पडतो
मन चिंब चिंब करतो
मातीच्या कणाकणातून
सारा प्रदेश गंधाळतो..

पहिल्या पाऊस सरीचा
पडतो पहिलाच थेंब
पेरल्या बीयांना
आलं इवलस कोंब..

मेघ नाचत येते
अंग भिजते सारे
सईच्या गालावरती
प्रेमाची खडी खुले ..

भाताच्या शेतामध्ये
रोवनी मजूर करतात
डोकावून पाहतो जोंधळा
सुगीच्या हंगामात….

पावसाच्या आठवणीने | पावसाळा आणि आठवणी | Best Paus Marathi Kavita 2023

वावरात रोज जाते
आई बांधून भाकर
काळ्या आईच्या उदरातून
जन्मते नवे अंकुर …

झिम्मड पावसात
उमटली सप्तरंगाची कमान
लपछपतो रवी
प्रकाशतो तेज होऊन ..

सजली फुलबाग
हिरवे झाले डोंगर
काळ्या वावरात पसरली
हिरवी सोन्याची चादर …

वाट झाली चिखल
खांद्यावर वाहती माती
शेताच्या बांधावरती
राघूमैनाची फिरते जोडी …

पादपाच्या पानापानातून
रिमझिम पाऊस बरसतो
वायटूळ उठता नभात
कौलारू उडवून जातो…

भीनला रोमारोमात पाऊस
बरसतो बेभान होऊन
नदीच्या पल्याहाड
गाव सईचं नवीन..

मृगाच्या सरीमधून
पेरली नवसृजन शेती
आ-याच्या मातीमधून
इवलेसं अंकुर उगवती…

काळोख दाटल्या मनाला
प्रेमाची भाषा कळते
हिरव्या मंदज्वलाने
जीवनाचे सोने होते …

पाऊस धारा पडती गारा
झेलून घेतो भूधारा
थुई थुई नाचतो लांडोर
आपला फुलवतो पिसारा…

डोंगराच्या कमानीतून
मीन वाहून येत
घालून बांध ओहळात
नाव डुलते पाण्यात ..

जलधारा पावसाचा
मन रिझवून जाते
पहिल्या प्रेमाच्या फुलांचा
सुगंधा देऊन जाते…

व्याकुळ या धरणीला
मोहून टाकतो जलधारा
मातीच्या ढेकलाचा
मऊ बनतो वाफारा …

नदीच्या पात्रामध्ये
घर वाळूचे बांधतो
येता लाट पाण्याची
घर मोडून जातो…

बरसल्या धारामधून
रानं धवलमय झालं
आठवणीच्या पावसानं
बालपण स्मरलं ..

नभ उतरू आलं
खळखळ वाहतो झरं
सईच्या आठवणीने
बेभानं झालं मन ….

मरगळलेल्या वाटांना
नवी ऊर्जा देते
पावसाच्या वर्षावान
रान हिरव होते..

शेतकरी दादा शेतात
आपले रक्त आठवतो
जगाच्या उन्नतीसाठी
आपला घाम जिरवतो …

पाखराच्या मंजुळ गाण्याने
संगीततली सारी धरती
काव्यात दंगून गेला
संदीप एकातवंती ..

पापणीच्या अश्रुतून
पाझरतो उष्णधारा
दुःखात ही संदीप
शोधतो जीवनधारा….

पावसा सकट भिजाव
सार रान चिंबाळलं
रजनीच्या प्रहार येतो
ओसंडून थेंब टपोरं..

भिरभिरती पाखरं
डोलतो धान शेतात
झुळझुळ वाहतो
सरिता कड्याकपारीत…

पाऊस पाणी पाऊस गाणी
धरती भिजते राणोराणी
आठवणीच्या पावसामधून
जीवन फुलते क्षणोक्षणी ….

मन पाऊस पाऊस
सारं हर्षुन गेलं
पावसाच्या आठवणीने
माझं जीवन तृप्त झालं….

पावसाच्या आठवणीने | Best Paus Marathi Kavita 2023

जर आपल्याला देखील कविता लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता.

आमच्या इतर कविता वाचा

लग्न म्हणजे काय असते ?

लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *