बऱ्याच वेळा तोच तोच नाष्टा करून कंटाळा येतो. कांदा पोहे, शिरा, उपीट आणि उपवासाच्या वेळेस साबुदाणा खिचडी या नेहमीच्या पदार्थंना सोडून जर जिभेवरती चिटकून राहील अशी चव हवी असेल तर भाजणीचे थालीपीठ हा एक उत्तम पर्याय आहे. गरमागरम भाजणीचे थालीपीठ त्यावर लोण्याचा गोळा आणि दही हे कॉम्बिनेशन तर स्वर्ग सुखासारखे आहे. बरेच लोक भाजणी विकत आणतात पण थालीपीठाचा साठी लागणारी भाजणी घरी करूया कारण ही फार सोपे असते आणि ती बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला मग जास्त वेळ न दवडता आपण Bhajaniche Thalipeeth Recipe in Marathi | अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे थालीपीठ मराठी रेसिपी बघूया.
Bhajaniche Thalipeeth Ingredients :
भाजणीचे साहित्य
मुगाची डाळ एक वाटी , तांदूळ एक वाटी , चण्याची डाळ एक वाटी , मटकी एक वाटी , गव्हाचे पीठ एक वाटी आणि धने गरजेनुसार
थालीपीठ साहित्य
तिखट , मीठ , कांदा बारीक चिरलेला , कोथिंबीर बारीक चिरलेली , हळद , लोणी आणि दही
Bhajaniche thalipeeth Recipe in Marathi
भांड्यामध्ये मुगाची डाळ , चण्याची डाळ वेगवेगळ्या घेऊन स्वच्छ धुऊन घ्या आणि कडक उन्हात वाळून द्या
वाळवून झाल्यावरती एका मोठ्या कढईमध्ये आधी मुगाची डाळ भाजून घ्या आणि ती वेगळी काढून घ्या
आता चण्याची डाळ घेऊन कढईमध्ये चांगली भाजून घ्या आणि ती वेगळी करून ठेवा
तांदूळ शुद्ध भाजून घ्या आणि एका ताटात काढून घ्या
यानंतर मूठभर धने घेऊन कढईमध्ये भाजून घ्या
सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर वाटून घ्या जर भाजणी कमी प्रमाणात असेल तर तुम्ही घरी सुद्धा देलू शकता
वरील मिश्रणात थोडे गव्हाचे पीठ घाला अशाप्रकारे तुमची खाली पीठ भाजणी तयार होईल
आता आपल्याला जेवढे थालीपीठ बनवायचे त्या हिशोबाने भाजणी काढून साईडला घ्या
Bhajaniche Thalipeeth Recipe in Marathi Language | अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे थालीपीठ मराठी रेसिपी

बाजूला घेतलेल्या भाजणीमध्ये चवीनुसार कांदा कोथिंबीर मीठ हळद तिखट घाला
यामध्ये गरजेनुसार पाणी घालून पीठ मळत रहा
जेव्हा छान मापामध्ये तव्यावर टाकण्यासारखे पीठ तयार होईल तेव्हा त्याचे छोट्या छोट्या आकाराचे थालीपीठ बनवा
थालीपीठाला व्यवस्थित दोन्ही बाजूंनी तव्यावरती भाजून घ्या
गरम गरम झालेली थालीपीठे लोणी किंवा दही यांच्यासोबत सर्व करा आणि कशी वाटली ते नक्की सांगा
Bhajaniche Thalipeeth Recipe in Marathi Language | अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे थालीपीठ मराठी रेसिपी
पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.