Chhatrapati Sambhaji Maharaj- छत्रपती संभाजी महाराज इतिहास

Chhatrapati Sambhaji Maharaj- छत्रपती संभाजी महाराज इतिहास

Chhatrapati Sambhaji Maharaj- छत्रपती संभाजी महाराज इतिहास
आजचा लेख आपण वाचणार आहोत अशा महाराजांबद्दल जे कधी युद्धाच्या मैदानात हारले नाही. पण, इतिहासानी त्यांना हरवलं. छत्रपती संभाजी महाराज! छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती. यांची कथा अशी आहे की कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा माणूस भावनिक होतो.

14 मे 1657 रोजी त्यांचा जन्म झाला. आज आपण ज्या भारताला जाणतो त्या भारताला स्वतःचे अस्तित्व देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा हातभार आहे. त्यामुळे तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे की हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा. आणि तुम्हाला वाटत असेल की ही माहिती अजून लोकांपर्यंत पोहोचावी तर तुम्ही ती जास्तीत जास्त लोकांना शेअर करावी. 

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याची सुरुवात एका घडू नये अशा घटनेनी घडली. वयाच्या फक्त दुसऱ्या वर्षी त्यांच्या आईंचे निधन झाले. अशावेळी त्यांच्या आजी जिजाबाई यांनी त्यांचे लालन पालन केले.” एक योद्धा युद्ध फक्त शक्तीने नाही तर युक्तीने पण जिंकतो” हे त्यांना लहानपणीच शिकवले गेले. संस्कृत बरोबर संभाजी महाराजांना 13 भाषा अवगत होत्या. त्यांना पोर्तुगीजांची पोर्तुगीज भाषासुद्ध येत होती. त्यामुळे त्यांना गोव्यामध्ये पोर्तुगीज टोळ्यांसोबत युद्ध करताना त्याचा उपयोग झाला.

लहानपणीपासून अशक्य गोष्टी करणे संभाजी महाराजांना माहीत होते. ते फक्त नऊ वर्षाचे होते जेव्हा औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांसमोर दोस्तीचे फसवे नाटक केले. तसेच संभाजी महाराजांसोबत आग्र्याला बोलावले. आणि त्यांना जेलमध्ये टाकले. कुणी दुसरे असते तर घाबरले असते पण छत्रपती संभाजी महाराज सामान्य नव्हते. त्यांनी हार मानण्यासाठी नकार दिला आणि एक नऊ वर्षाचा मुलगा आणि त्यांचे वडील औरंगजेबाच्या लाखो सैन्याच्या नाका खालून निसटून परत आले. ते फक्त दहा वर्षाचे होते जेव्हा आमेरच्या राजाकडे हे शिकायला गेले की शासन कसे करतात. वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांनी इतर राजांना जोडायला सुरुवात केली. ते फक्त 19 वर्षाचे होते तेव्हा रायगडावर पैशांची आणि स्वराज्याची महत्वाची निर्णयावर निकाल देऊ लागले. ते फक्त 23 वर्षाचे होते जेव्हा त्यांचे वडील शिवाजी महाराज यांचे निधन झाले.

How did Chhatrapati Sambhaji Maharaj died? छत्रपती संभाजी महाराज जयंती इतिहास

how did Sambhaji Maharaj died छत्रपती संभाजी महाराज इतिहास

आपल्याला इतिहासात नेहमी हे बघायला मिळते की जेव्हा एका महान राजाचे निधन होते तेव्हा ते राज्य असता व्यस्त होते पण छत्रपती संभाजी महाराजांनी हे होऊ दिले नाही. त्यांनी घेतलेली सगळी निर्णय भावनिक नाही तर तर्कशुद्ध होती. राज्यासाठी परकीय शत्रूंना बाहेर काढणे पण गरजेचे होते आणि एक अर्थव्यवस्था तयार करणे पण गरजेचे होते. हे संभाजी महाराजांना माहीत होते. महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर येथे औरंगजेबाचा किल्ला होता, देवगिरीचा किल्ला. तिथंचा खजाना पूर्ण मराठा साम्राज्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गरजेचा होता. ह्याच विचाराने एका 23 वर्षाच्या योध्याने औरंगजेबासारख्या मोठ्या शत्रूला हरवले. आणि एकदा नाही तर परत परत. अनेकदा. औरंगजेब स्वप्नात सुद्धा विसरणार नाही इतक्यावेळा. वीस हजाराची छोटीशी फौज घेऊन आठ लाख मुघल सैन्याला हरविले. जेव्हा औरंगजेबाने पोर्तुगीजांची मदत घेण्याचे ठरवले तेव्हा संभाजी महाराजांनी पोर्तुगीज नौदलाला सुद्धा हरवले. त्यांनी मुघलांना इतके छळले की त्यांचे उत्तर भारतावरचे लक्ष विचलित झाले. आणि राजस्थान, पंजाब, बुंडेलखंड सारख्या राज्यांमधून पुन्हा भारतीय राजे उदयाला येऊ लागले. हे संभाजी महाराजांचे कार्य आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या चळवळीला जन्म दिला छत्रपती संभाजी महाराजांनी तिला जिवंत ठेवले.

फक्त नऊ वर्षांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी 120 युद्धे लढली आणि एक सुद्धा हरले नाहीत. तरीपण शेवटी त्यांच्या आपल्याच लोकांनी त्यांचा विश्वास घात केला. गणोजी शिर्के, संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई यांचे भाऊ होते. संभाजी महाराजांनी त्यांना वतनदारी देण्यास नकार दिला. असे करणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियमाच्या बाहेर होते. हे स्वराज्याच्या संकल्पनेच्या विरुद्ध होते. त्याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी जेव्हा छत्रपती संभाजी महाराज छुप्या मार्गाने रायगडाला चालले होते तेव्हा गनोजी शिर्के यांने ही माहिती औरंगजेबाला दिली. आणि संभाजी राजे पकडले गेले.

How did Chhatrapati Sambhaji Maharaj died? छत्रपती संभाजी महाराज जयंती इतिहास

(महत्त्वाचा मुद्दा- काही इतिहासकारांच्या मते गणोजी शिर्के ही काल्पनिक व्यक्ती आहे)

कोणत्याही राजकीय कैद्याला एक योग्यतेची वागणूक दिली जाते आणि संभाजी महाराज तर एक महाराज होते. पण त्यांना अमानुषपणे छळले गेले. शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या सुद्धा. औरंगजेबाने त्यांच्यासमोर तीन अटी ठेवल्या. पहिली की संभाजी महाराज औरंगजेबाला बादशाह म्हणून मान देतील. दुसरी अट मराठ्यांचा सर्व खजिना मुघलांच्या ताब्यात दिला जावा. आणि तिसरी अशी की संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारावा. आणि महाराज कोणत्याही परिस्थितीमध्ये या अटी स्वीकारणार नव्हते.

इथून पुढचा अमानवी छळाचा भाग वाचणे सर्वांनाच जमेल असे नाही. त्यामुळे जर तुम्हाला अत्याचाराचे तपशील वाचायचे नसतील तर तुम्ही गुलाबी रंगातले शब्द स्किप करून पुढे वाचायला सुरुवात करावी. 

How did Chhatrapati Sambhaji Maharaj died? छत्रपती संभाजी महाराज जयंती इतिहास

संभाजी महाराजांना उंटावर उलटे लटकवून पूर्ण शहरभर फिरवले गेले. लोकांना त्यांच्यावरती दगड मारण्यासाठी उकसावले गेले. हे इतकेच नाही तर त्यांच्यावर मूत्रविसर्जन करायला पण विचारले गेले. कैदी मध्ये 40 दिवस त्यांच्यावरती प्रचंड अत्याचार करण्यात आले. एकेक करून त्यांच्या हाताच्या बोटांची नखे उपसण्यात आली. त्यांच्या डोळ्यात मिरचीची भुकटी टाकण्यात आली. अवजारांच्या साह्याने त्यांची त्वचा सोलून काढण्यात आली. लोखंडाच्या सळ्या बघितल्या का तुम्ही? त्या सळ्यांना अग्नीमध्ये लालबुंद होईपर्यंत तापवण्यात आले आणि त्या संभाजी महाराजांच्या डोळ्यात खूपसून त्यांना आंधळे करण्यात आले. 

रोज विचारण्यात आले की तुम्हाला अटी मान्य आहेत का. पण आपल्या छत्रपतींचे उत्तर एकच होते. “नाही” एक एक करून त्यांची बोटे तोडण्यात आली. त्यांचे हात पाय तोडण्यात आले. इतकेच नाही तर त्यांची जीभ सुद्धा छाटण्यात आली. तरीसुद्धा त्यांचे उत्तर नाहीच होते. ते बदलले नाही. औरंगजेबाने त्यांचे शरीर तोडले पण त्यांचे मन तोडू शकला नाही. त्यांची आत्मा तोडू शकला नाही. शेवटी त्यांना हिंदू धर्मानुसार अंत्यविधी सुद्धा दिले गेले नाही. त्यांच्या शरीराचे तुकडे करून करून नदीमध्ये फेकण्यात आले.

How did Chhatrapati Sambhaji Maharaj died? छत्रपती संभाजी महाराज जयंती इतिहास

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांसोबत जे केले ते अमानवी होते. पण किती लोक असे आहे की जे हे स्वीकारायला तयार आहे? किती लोक आहेत जे औरंगजेबाला त्या काळाचे इतिहासाचे फळ म्हणून शांत बसतात? त्याच्यावरती पुस्तके लिहितात? त्याला साजरे करतात? आणि किती लोक अशी आहेत जी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याला जाणतात? माझा ब्लॉग वरती मी धर्माच्या गोष्टी करणे टाळतो पण जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा विषय येतो ते फक्त धर्माचे रक्षण करत होते असं म्हणणं चुकीचे आहे. ते स्वराज्याच्या संकल्पनेचे रक्षण करत होते. ते त्यांच्या वडिलांच्या आठवणी जिवंत ठेवत होते. आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. 

मौर्य आणि गुप्त साम्राज्यानंतर आपण आपल्या भारत देशाची ओळख कुठेतरी हरवली होती. त्यानंतर अहोम साम्राज्याने आसामच्या संघर्षामध्ये आपल्या ओळखीला जागे ठेवले. त्यानंतर चोळ आणि पांड्य साम्राज्य यांनी आपल्या संस्कृतीला ब्रह्मदेशासारख्या इतर देशांपर्यंत पोहोचवले. आणि त्यानंतर आले मराठाराजे ज्यांनी स्वराज्याची संकल्पना घेऊन आपला इतिहास टिकवण्याचा दुसरा अवधी दिला. 

How did Chhatrapati Sambhaji Maharaj died? छत्रपती संभाजी महाराज जयंती इतिहास

75 वर्षांपूर्वी तर इंग्रज होते त्यांच्याकडे कारण होते आपला इतिहास लपवण्यासाठी. पण आज? आज तर आपण स्वतंत्र आहोत. आज आपल्याकडे काय कारण आहे ही गोष्ट आपल्या नव्या पिढीपासून लपून ठेवण्यासाठी? छत्रपती संभाजी महाराज एका तुरुंगात होते जेव्हा त्यांना वीरगती मिळाली. पण आज तर आपण त्यांना त्यांच्या गोष्टीमधून आपण त्यांना मुक्त करू शकतो. त्यांचे चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून. 

या लेखाच्या सुरुवातीला मी एक खोटे बोललो होतो की छत्रपती संभाजी महाराजांना इतिहासानी हरवलं. पण हे खरं नाहीये. कारण जरी काही इतिहासाची पुस्तके त्यांना विसरली असतील तरी आपले इतिहासाचे शिक्षक त्यांना विसरले नाही. जसे जिजामातांनी छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांना लहानपणी रामायण, महाभारताच्या कथा सांगितल्या. तशा आपल्या इतिहासाच्या शिक्षकांनी आपल्याला या दोन्ही थोर पुरुषांच्या कथा सांगितल्या आणि त्यांना जिवंत ठेवले. छत्रपती संभाजी महाराजांच्या गोष्टीची आठवण ठेवणे म्हणजे त्यांच्या त्यागाची आठवण ठेवणे असे आहे. 

Chhatrapati Sambhaji Maharaj- छत्रपती संभाजी महाराज इतिहास

अशा कित्येक कथा आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यासाठी आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

Reference Video:- Chhatrapati Sambhaji Maharaj l The Forgotten Prince of India

Read Next- शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *