“बालपण देगा देवा” ही इच्छा प्रत्येक माणसाची असते. पण जसा तो मोठा होत जातो आपल्या रोजच्या कामात व्यस्त होतो आणि जीवन जगायचंच विसरतो. Childhood Memories in Marathi ह्या लहानपणीच्या सुखद आठवणींवर लिहिलेला लेख आहे.
असाच एक अनुभव आज मला शेजारचा काकाकडून आला. रात्री जेवण झाल्यावर आम्ही रोज गप्पा मारतो, पण आज त्यांचा चेहरा काहीतरी वेगळा दिसत होता. मी विचारला त्यांना “काय हो काका आज कोणत्या धुंदीत, काकू काही बोलली का?”, असा थट्टे मध्ये मी त्यांना प्रश्न केला. यावर त्यांचं उत्तर ऐकून मी विचारातच पडलो. “माझं वय आता पंचावन्न झालंय. रोजचा तो बसचा प्रवास, वेळेवर ऑफिसला जायचं नाही तर लेट झालं की लेट रिमार्क घ्यायाचा. दिवसभर राबायचं आणि परत घरी येऊन कुटुंबाला सांभाळायचं. महिना संपला की पगार घ्यायाचा आणि खुश व्हायचं. या रोजच्या धावपळीत आपण जगायचंच विसरून गेलोय.
उमर पचपन दिल बचपन : बालपणीच्या आठवणी

Marathi Story : उमर पचपन दिल बचपन- बालपण ची स्वप्न
“लहान असताना किती स्वप्न रंगवले होते. मोठा झाल्यावर पायलट बनायचं, उंच उडायचं, ढगात जाऊन ढगांना हातात घायचं. फक्त विचार जरी केला तरी खूप आनंद होत होता. मित्रांसोबत शाळा सुटल्यावर आम्ही कधी लवकर घरी गेलोच नाही. शाळेतून येताना चिंचेच्या झाडांची बाग लागायची. मग काय, दप्तर ठेवायचं झाड्याच्या खोडापाशी आणि झाडावर चढायला सुरवात करायची. माझा एक मित्र होता, मोटूराम, चांगला गब्दुला, त्याला काही झाडावर चढता येत नव्हतं. आम्हीच मग चिंचा तोडायच्या आणि त्याला झेलायला लावायच्या. त्यानंतर आमचा सुरपारंब्यांचा खेळ सुरु व्हायचा. इकडून तिकडे झाडावर उड्या मारत खेळत सुटायचं. संध्याकाळ कधी होत होती समजायचंच नाही.
मग काय घरी गेल्यावर मळलेले कपडे पण आई आधी दोन फटके द्यायची पण नंतर अंघोळ घालून कपडे धून काढत होती. माझ्यापेक्षा तिलाच माझे कपडे वाळायची काळजी कारण एकाच ड्रेस होता. “
बालपणीच्या आठवणी बालपण | Childhood Memories in Marathi
बालपण शाळेतील आठवणी
“त्याकाळात लोकांकडे पैसा कमी होता पण एकमेकांसाठी भरपूर वेळ होता. लोक एकमेकांकडे गप्पा मारायला यायचे, आपले सुख दुःख सांगायचे आणि सुख दुःखात सहभागी व्हायचे. कोणाच्या घरचा माणूस वारला तर त्याचा घरी रोज शिदोरी पाठवायचे. बालपणी आम्ही अंघोळ कधीच घरी केली नाही. सकाळी उठायचं आणि नदीला पाळायचं. त्याकाळात कसली चड्डी आणि कसलं काय, आहे तीच काढायची धुवायची आणि वाळत टाकून नदीत पोहायला लागायचं. साबण म्हणजे काय ते तर माहीतच नव्हतं. नदीचीच माती घायची आणि अंगाला चोळून धून काढायची. तासंतास नदीत डुंबायला काय मजा येत होती.
सूर्य डोक्यावर आल्यावर लक्ष्यात यायचं शाळेला उशीर झाला आता तर नक्कीच मार भेटणार. वाळली न वाळलेली चड्डी घालायची धावतच घरी जायचं. आईने डबा भरलेलाच असायचा तो उचलायचा, दप्तर घ्यायचं आणि धावत शाळेत जायचं.
मग असायचेच गुरुजी आमच्या स्वागतासाठी उभे. कारण नंतर विचारणार उशीर का झाला म्हणून आधी दोन छड्या देणार हातावर आणि शाळेच्या ग्राउंडला चक्कर मारायला लावणार. मग वर्गात आल्यावर विचारणार काल दिलेला अभ्यास केला का? थोड्यावेळ तर विषयही आठवायचा नाही, हाच विचार यायचा कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा होता. मग काय खा परत छड्या. शाळेत शिकायचं कमी अमी मस्ती जास्त घालायची. खरं म्हटलं तर मजा यायची लहानपणी. “
गावाची जत्रा- बालपणीच्या आठवणी | Childhood Memories in Marathi

“गावात जत्रा भरली रे भरली मग तर काय आनंद गगनात मावत नव्हता. आई कडून २ रुपये, बाबांकडून ५ रुपये आणि आजोबांकडून १ रुपया हे ठरलेलं असायचं. आणि मी घरातला मोठा असायचो तर बाबा मला सगळे गेल्यावर अजून ५ रुपये द्यायचे, सगळ्यांना खाऊ दे तुझा कडून असे बोलून पाठीवर थाप द्यायचे आणि मजा करा असे म्हणत जा म्हणायचे. जत्रेत गेल्यावर आधी शोधायचा तो मोठा पाळणा. त्याची मजा ती काय वेगळी. त्यानंतर भेळीचं दुकान शोधायचं, भरपेट खायचं.
इकडे तिकडे हिंडून पूर्ण जत्रा पालथी घालायची. खेळणी बघत, माकडाचे खेळ बघत जत्रा फिरायची. जत्रेत शेवटी एक चित्रपट गृह असायचा. आजकाल तर पाहिजे तेव्हा थिएटर ला जाता येतं, पण त्यावेळी फक्त जत्रेत असायचे चित्रपट. तीन तास तो चित्रपट पाहून झाल्यावर अंगात काय स्पुर्ती यायची, घरी जय पर्यंत चोर शिपाई खेळत जायचं.
मनातील लहान मुल जिवंत राहू द्या
“खरंच ते दिवस आठवले की ऑफिसचा तणाव आणि इतर टेन्शन निघून जातं. या कामाच्या नादात खरंच जगायचं विसरलो असंच वाटतंय. तुझं आत्ताच कॉलेज संपलय, तू माझ्या सारखं आयुष्य नको घालवू. तुझा मनातलं लहान मूल कायम जिवंत राहूदे. तरच आयुष्याची खरी मजा तुला समजेल. आपण जगात आलोय ते फक्त राबायला नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला. आयुष्यात सगळं करायचं, कधीच स्वतःला जाणवू नको देऊ की हे केलं असतं, ते केलं असतं.
जे करायचं आहे ते आत्ताच कर कारण विचारात दिवस कसे निघून जातात ते कळत नाही आणि मग माझ्या मनासारखी खंत निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घे आणि स्वतःच नाही तर दुसऱ्याला पण आनंद दे. बोलता बोलता बराच उशीर झाला, जा तू आता झोपायला, घरचे वाट बघत असतील”, असं म्हणत ते निघून गेले. त्यांच्या गोष्टीचा माझ्यावर एवढा परिणाम झाला की जगण्याकडे बघण्याचा माझ्या दृष्टीकोनच बद्द्लला. आपल्याला आपले नित्यनियमाने काम तर करायचंच आहे पण ते करताना आपण बदलता काम नये. “
बालपणीच्या आठवणी | Childhood Memories in Marathi
मित्रानो तुमच्यातला लहान मुलाला कायम हसत ठेवा आणि खुश राहा.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ॥
Author- Chaitanya Thorat

बालपणीच्या आठवणी | Childhood Memories in Marathi
खालील लेख वाचा
चैतन्य यांचे आणखी लिखाण वाचा – रक्षाबंधन
वाचा लहान मुलांवर संस्कार कसे करावे
Msta ch??…
Balpan kharch khup chan asta ??…