कॉलेज लाइफ मराठी कविता | कधी विसरू न शकणाऱ्या आठवणी
आजही आठवतात मला
त्या कॉलेज मधील आठवणी
मित्रांसोबतची ती मस्त आणि
कॉलेज च्या कट्यावरचा तो चहा पाणी….
कॉलेज जायचा तर आमचा
तो नुसताच बहाणा होता….
मित्रांशी भेटण्याचा एकमात्र
तो आमचा ठिकाणा होता….
लेक्चर तर आम्ही
कधीच करायचं नाही…
आणि कधीकाळी केलंच तर
लेक्चरर कडे लक्ष मात्र राहायचं नाही….
एकदम मागच्या बाकावर बसून
नुसत्याच पोरी बघत राहायचं….
कधी त्यांना डिवचायचं
तर कधी त्यांच्या खोड्या काढायचं…….
एवढंच आमचं काम होतं…
मित्रांशी भेटायचं इंतजाम होतं……
कॉलेज लाइफ मराठी कविता | कधी विसरू न शकणाऱ्या आठवणी

कॉलेज सुटल्यावर होता
तो आमचा कॉलेज चा कट्टा….
तिथंच आम्ही कॉलेज सुटल्यावर
बसून करत होतो मुलींची थट्टा….
एका हातात असायचा चाय
आणि हातात असायचा सुट्टा….
सुट्टया मधून निघणाऱ्या धुरासोबत
आपल्या आपल्या मनात दडलेल्या
दुःखांना सुद्धा उडवत होतो…..
हातातील सुट्टा तर मात्र
नशा करण्यासाठी सुट्टा तर एक बहाणा होता….
आयुष्याची खरी नशा तर
आमच्या मित्रांमधल्या मैत्री मध्ये होता….
कधीतरी झाले आमच्या मध्येही खूप सारे मतभेद
सोडवून तर कधी वेळ आलीच तर विसरून भेद
आम्ही सारे परत एकत्र येत होतो…..
कधी आलेच कुणावर संकट
तर आम्ही मिळून एकत्र सोडवत होतो…
कधीच आम्ही कुणाबद्दल स्वार्थ, तर कधी ईर्ष्या
आम्ही कधीच करत न्हवतो….
अशीच आम्ही एकमेकांप्रती
मैत्री निभवत होतो….
कॉलेज लाइफ मराठी कविता | कधी विसरू न शकणाऱ्या आठवणी
वर्षभर कधी आम्ही लेक्चर बरोबर केला नाही
नोट्स आम्ही कधीच घेतला नाही…..
आणि अभ्यासाला हाथ कधी लावला नाही
परीक्षेचा टेन्शन आम्ही कधीच वर्षभर घेतला नाही….
परीक्षा ऐन तोंडावर आली की
मग मात्र आम्ही सगळे मिळून
अभ्यासाला लागत होतो
इकडून तिकडून नोट्स जमवून
एकत्र बसत होतो….
कट्टयाकडे लक्ष नाही
मुलींकडे तर नाहीच नाही
पण सुट्टयाला पण हात लावत न्हवतो….
परीक्षेकडे लक्ष राहत होतं आमचं
अभ्यास आणि फक्त अभ्यासच करत होतो….
आणि वर्षभर अभ्यास आणि लेक्चर करत नसतांना देखील
आम्ही सर्व मित्र सगळे पेपर काढत होतो…
आणि वाटलं च कुणाचं पेपर राहू शकते बॅक
तर त्याला आम्ही कॉप्या ही पुरवत होतो….
मित्रांच्या या दुनियादारी मध्ये
आम्ही अशीच मैत्री निभवत होतो……
कॉलेज लाइफ मराठी कविता | कधी विसरू न शकणाऱ्या आठवणी
मित्रांच्या या दुनियादारी च्या आठवणी
अजूनही मनाच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यात
घर करून राहिल्या आहेत….
गेले ते दिवस
आठवणी तेवढ्या राहिल्या आहेत….
गेलेले ते दिवस पुन्हा कधीच येत नाही
आठवणी विसरूनही विसरता येत नाही….
मैत्रीमधल्या अशा सुखमय आनंदाला
जगातल्या कुठल्याच आनंदाला सर येत नाही…
मैत्री ही मैत्री च असते
त्याची कुणासोबतही तुलना करता येत नाही…..
कवी आशु छाया प्रमोद (रावण)

तुम्हाला आमची आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा>>>>.
रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा>>>>.
Pingback: Friendship Shayari in Marathi | मित्र खुश करतील या 20 शायरी