Corona Symptoms in Marathi- कोविड आजार लक्षणं
डिसेंबर२०१९ मध्ये चीन मध्ये सुरू झालेल्या कोरोना आजाराने हळूहळू सगळ्या जगाला वेठीस धरले. भारतातही कोरोना येऊन ४ महिने झाले…..आज संपूर्ण भारतात कोरोना पसरला आहे… कोरोना कसा होतो त्या पासून काय त्रास होतो हे एव्हाना सर्वांना बातम्या समाज माध्यमातून आरोग्य केंद्रा मधून बऱ्याच लोकांना समजले आहे…..समाज माध्यमांमधून उलट सुलट पोस्ट मधून होणाऱ्या चर्चा मधून कधी कधी चुकीची माहिती पसरते….जसे की कोरोना साधा सर्दीचा आजार आहे…ते एक जागतिक षडयंत्र आहे… कोरोना शुल्लक आजार आहे …अश्या अनेक माहितीने मनात शंका येतात नेमक काय आहे कोरोना….
रोज इतके रुग्ण वाढत आहे सोबत मृत्यू पडणारांची संख्या ही वाढत आहे…दिलासादायक म्हणजे बरे होनारांच प्रमाण ही चांगलं आहे…..अश्याने बरेच जण गोंधळून गेले आहेत ..या लेखाचा उद्देश कोरोनची नेमकी शास्त्रीय माहिती लोकापर्यंत पोहचवणे ही आहे .
Corona Symptoms in Marathi- कोविड आजार लक्षणं/ Corona Lakshane/ Covid symptoms in marathi
कोरोनाचा प्रसार आणि लागण

कारोना…हा आजार Novel Covid19 या विषाणू मुले होतो..खोकने..शिंकने..मोठ्यांदा बोलणे..स्पर्श करणे…यामुळे कोरोना झालेल्या रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांना हवेच्या माध्यमातून covid 19 विषाणू ची बाधा होऊन कोरोना होतो….अतिसंक्रमक असा हा आजार आहे…अतिशय वेगाने हा पसरतो त्यामुळे यावर नियंत्रण मिळवणे अवघड असते…
Corona Symptoms in Marathi कोविडची 19/ कोरोनाची मुख्य लक्षणे:
ताप कोरडा खोकला
श्वास घेण्यास त्रास
ही ३ ठळक लक्षणे आहेत.
इतर लक्षणे:
जुलाब होणे
उलटी होणे
तोंडाला चव नसणे..
सर्दी
घसा दुखणे
डोके दुखी..अंग दुखी..सांधे दुखी
Corona Symptoms in Marathi- कोविड आजार लक्षणं/ Corona Lakshane/ Covid symptoms in marathi
वरील लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा…कृपया स्वतः घरगुती उपाय करू नये. हा आजार खूप लवकर पसरतो आणि रुग्णाच्या न कळत त्याचा प्रसार होतो. त्यामुळे कुटुंब आणि समाजाच्या संरक्षणासाठी रुग्णाने लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा..
आजच्या भागात कोविडची 19/ कोरोनाची लक्षणे याची माहिती आपण पाहिली पुढील भागात Covid19/ Corona उपचार आणि मर्यादा यावर जाणून घेऊ…
धन्यवाद..
Corona Symptoms in Marathi- कोविड आजार लक्षणं
टीप : या लेखाचे लेखक स्वतः वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांना कार्याचा उत्तम अनुभव आहे.
Author-Abhijit Bhosale
BAMS, General Practitioner
9158422932

आमचे इतर महत्वाचे ब्लॉग वाचा
CLICK FOR FSSAI License- Login, Register, Full form: अन्न सुरक्षा परवाना- प्रक्रिया व फायदे
आरोग्य विषयक जागृती निर्माण करणारे लेख अजून टाकावेत . धन्यवाद…