Dahi vada recipe Marathi

Dahi vada recipe Marathi | दही वडा मराठी रेसिपी | विकत सारखी चव

तसे पाहिले तर महाराष्ट्रात सर्वत्र प्रसिद्ध असलेला दहिवडा हा दक्षिणेकडे थाइरवडा नावाने प्रसिद्ध आहे तसेच उत्तर भारतात त्याला दही भल्ला असे म्हणतात. बरेच ठिकाणी हा मुख्य थाळीचा एक अविभाज्य घटक मानला जातो बनवायला हा अतिशय सोपा असून चवीला मात्र प्रचंड स्वादिष्ट असा असतो. काही जणांना तर दहीवडा इतका आवडतो की त्याचा एक एक घास त सुखाने आस्वाद घेतात. आपण आठ ते दहा दहिवडे बनवण्याची रेसिपी बघणार आहोत तयारीसाठी चार ते सहा तास लागतात यामध्ये आपल्याला डाळ भिजवायचे असते आणि दही वडे बनवण्यासाठी फक्त पंधरा मिनिटे पुरेसे असतात.
Dahi vada recipe in Marathi written | दही वडा मराठी रेसिपी | विकत सारखी चव

Dahi vada Ingredients

अर्धा कप उडीद डाळ , पाव कप मुगाची डाळ या डाळी वेगवेगळ्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. कमीत कमी चार तास तरी भिजावेत याची दक्षता घ्या.

आल्याचा तुकडा एक इंच , दोन ते तीन हिरव्या मिरच्या , पाव कप कोथिंबीर , 300 ग्रॅम ते 500 ग्रॅम दही , पाव कप दूध , साखर तीन ते चार चमचे , भाजलेली जिरेपूड एक चमचा , अर्धा चमचा लाल तिखट , अर्धा चमचा चाट मसाला , पाव चमचा काळे मीठ , ताक दोन कप , पाव चमचा हिंग , चवीनुसार मीठ , चिंचेची चटणी गोड , गरजेनुसार तेल

Dahi vada recipe in Marathi language दही वडा मराठी रेसिपी

Dahi vada recipe in Marathi written

सर्वात आधी ताक घेऊन त्यामध्ये हिंग आणि चवीपुरते मीठ टाका त्यानंतर हे मिश्रण ढवळून घ्या जर ताक अधिकच घट्ट असेल तर त्यात दोन कप पाणी टाका आणि मग ते ढवळून घ्या आणि बाजूला झाकून ठेवून द्या.

एका भांड्यामध्ये दही दीड चमचा साखर चवीनुसार मीठ आणि काळे मीठ घेऊन ते चांगले फेटून घ्या त्यामध्ये कुठेही राहू देऊ नका. याच मिश्रणामध्ये रूम टेंपरेचरला असणारे दूध पाव कप टाकून थोडेसे पातळ करून हे भांडे फ्रिजमध्ये थंड होण्यास ठेवावे.

भिजत ठेवलेल्या डाळी घेऊन त्यातले पाणी काढून टाका आणि त्या एकत्र करून मिक्सरमधून वाटून घे त्यात थोडे थोडे असे पाव कप पाणी टाका म्हणजे या मिश्रणाची पेस्ट तयार होईल पाणी शक्यतो जास्त वापरू नये म्हणजे हे मिश्रण पातळ होणार नाही.

आता डाळीचे मिश्रण घेऊन ते तळ हाताचा वापर करून एका दिशेने गोलाकार फेटून घ्या असे कमीत कमी दहा मिनिट तरी करावे त्यामुळे वडे हलके होण्यास मदत होते मिश्रण जेवढे चांगले फेटले जाईल तेवढे वडे मऊ मऊ आणि हलके होतील.

मिरची आले आणि कोथिंबीर हे मिक्सर मधून काढून घ्या आणि त्याचे जाड असे वाटण तयार करून घ्या.

Dahi vada recipe in Marathi language | दही वडा मराठी रेसिपी | विकत सारखी चव

हा वाटलेला मसाला डाळीच्या मिश्रणामध्ये मिसळून दहा मिनिटं बाजूला ठेवून द्यावा

आता आपण वडे तळण्यासाठी घेऊया वडे बुडतील कमीत कमी एवढे तेल कढईत घ्या आणि तेल गरम होऊ द्या त्यानंतर गॅस कमी करून छोटे छोटे गोड वडे तेलामध्ये अलगद सोडा वडे सोनेरी रंगाची होईपर्यंत तळावेत आणि खरपूस भाजून घ्यावेत

एका भांड्यामध्ये हलकी गरम पाणी घ्या आणि त्यात आपण तळलेले वडे तीन-चार मिनिटांसाठी बुडवून ठेवा ज्यामुळे आत मध्ये मऊपणा येईल

यानंतर वाड्यांमध्ये पाणी दाबून बाहेर काढावे असे करताना वडे तुटणार नाहीत याची काळजी घ्या यानंतर वडे ताकामध्ये भिजत ठेवा.

दही वडा सर्व करण्याची एक विशेष पद्धत आहे यामध्ये सगळ्यात आधी वडा डिश मध्ये टाकावा त्यानंतर त्यावर थंड दही घालावे मग आवडीप्रमाणे लाल मिरचीची पूड जिरे पावडर चाट मसाला हे सर्व त्याच्यावरती फवारावे. हिरवी तिखट चटणी आणि चिंचेची चटणी जर याच्यासोबत असेल तर फारच मजा येईल.

अशाप्रकारे तुमचे हॉटेल पेक्षाही उत्तम असेल दहिवडे तयार आहेत.

Dahi vada recipe in Marathi language | दही वडा मराठी रेसिपी | विकत सारखी चव

पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.

बाळगुटी म्हणजे काय ? आणि त्याचा वापर कसा करावा ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *