काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ. राधा खानझोडे यांची -देशधर्म- हि कविता -देश प्रेम कविता- या विषयावर असून हि एक Desh Bhakti Kavita in Marathi आहे
देशधर्म | Desh Bhakti Kavita in Marathi

आज तरी तू जाण पुरुषा, देशधर्म काय तो
हो समर्पित चरणी त्यांचे, बाप आणि माय तो…!!ध्रु०!!
घे बरे जाणून पुन्हा, राष्ट्रवीरांची कथा
जा जरा विचार त्यांना, कैदेत सोसिल्या व्यथा
रुबाब तुझा आजचा हा, आधार त्यांचा काय तो
हो समर्पित चरणी त्यांचे बाप आणि माय तो…. !!१!!🇮🇳
देश रक्षा, देश विद्या, देशभक्तीचा ध्वनी
देश प्रेमी साक्ष देतो, वार ऊरी झेलूनी
वाढवी तू धैर्य त्यांचे, जरी पुत्र तुझा नाय तो
हो समर्पित चरणी त्यांचे बाप आणि माय तो….!!२!!🇮🇳
हीत सर्वांचे जिथे, मार्ग तोची चांगला
देशहिता स्थान आधी, हाची धर्म आपला
रांगत्या मुलास शिकवा, देश धर्म काय तो
हो समर्पित चरणी त्यांचे बाप आणि माय तो…!!३!!🇮🇳
ज्येष्ठ तुज लाजून जावे, का करी ऐसी कृती
देश तुझा ज्ञान गुरू, विसरू नको ही संस्कृती
या विना का वेगळा, देश धर्म काय तो
हो समर्पित चरणी त्यांचे ,बाप आणि माय तो…!!४!!🇮🇳
देशभक्ती देशासाठी, जना मनात रुजली
बीज पेरले सेवेचे, आशा उरात जपली
जिंकू अथवा मरु , हीच प्रतिज्ञा आम्ही घेतो
हो समर्पित चरणी त्यांचे ,बाप आणि माय तो…!!५!!🇮🇳
संकट ओढवले कितीतरी ,नाही आम्ही डगमगलो
खंबीर माझी भारत माता, संकट झेलण्या सारसावलो
शूरवीरांचा देश माझा, माय भूमीस आम्ही जपतो
हो समर्पित चरणी त्यांचे, बाप आणि माय तो…!!६!!🇮🇳
बाजी लावली प्राणाची, भारत मातेच्या या सुपुत्राने
गदगद् झाली भारत माता, शहिदांच्या बलिदानाने
भारत माझा देश महान, आम्ही तिरंगा घेऊन गर्जतो .
हो समर्पित चरणी त्यांचे, बाप आणि माय तो…!!७!!🇮🇳
उगवली स्वातंत्र्याची पहाट, तिरंगा फडकला देशाचा
शूरवीरांचा देश माझा, अभिमान आम्हा तिरंग्याचा
देशासाठी प्राण अर्पुनी, पुत्र तुझा मी शोभतो …
हो समर्पित चरणी त्यांचे, बाप आणि माय तो…!!८!!🇮🇳
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, करू साजरा जल्लोषाने
उपकार आम्हावरी ते, केले माझ्या भारत मातेने
भारत माझा देश महान, एक मुखाने सारे बोलतो
हो समर्पित चरणी त्यांचे, बाप आणि माय तो…!!९!!🇮🇳
परक्यांची सत्ता होती, अमानवीय झाले अत्याचार
त्या दिवसाची स्मृती, आजही नाही कधी भुलणार
सर्व धर्म समभाव, भावना आम्ही पाळतो
हो समर्पित चरणी त्यांचे, बाप आणि माय तो…!!१०!!🇮🇳
🇮🇳जय हिंद – जय भारत🇮🇳

देशधर्म | देश प्रेम कविता | Best Desh Bhakti Kavita in Marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
देशधर्म | देश प्रेम कविता | Best Desh Bhakti Kavita in Marathi 2023
सुंदर रचना
अप्रतिम काव्य रचना.. कवयित्रीचे अंतरंग , भावविश्व खुलून व्यक्त झाली आहे.
खूप छान रचना.