Desh Bhakti Kavita 2023

म्हणजे स्वातंत्र्य | देश प्रेम कविता | Best Desh Bhakti Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी बाळकृष्ण दत्तात्रेय घरत यांची -म्हणजे स्वातंत्र्य – हि कविता -देश प्रेम – या विषयावर असून हि एक Desh Bhakti Kavita आहे

म्हणजे स्वातंत्र्य | Desh Bhakti Kavita

म्हणजे स्वातंत्र्य | देश प्रेम कविता | Best Desh Bhakti Kavita 2023

परकीय गुलामगिरी जूल्म मुक्तता
समता;स्वकीय राष्ट्रीय एकात्मता
म्हणजे स्वातंत्र्य…..
आनंदोत्सव,ध्वजावंदन;मन शांती
देशा परीवर्तन,बदल;उठाव क्रांती
म्हणजे स्वातंत्र्य……


खरोखरसी लोकशाही;लोकसत्ता
देशात एकसुुत्रीसी सार्वभौमत्वता
म्हणजे स्वातंत्र्य……
शहीदस्मृती,आठवण;जाण महान
शुभेच्छाआणि संदेश वर्षाव खाण
सांडलेलं रक्त ते देशभक्तांचं
जनक वेदणा नं असंतोषाचं
म्हणजे स्वातंत्र्य….


शूरविरांचा एक महान झंझावात
सामाजिक;सांस्कृतिक सुरुवात
म्हणजे स्वातंत्र्य…..
मोठं बंड,लढा,,क्रांती;उठाव
शोषणअनं गुलामगिरी हटाव
म्हणजे स्वातंत्र्य….


परकीय साम्राज्याचा -हास
मनी सा-या सदैवच उल्हास
म्हणजे स्वातंत्र्य…..
विकासाकडे वाटचाल;धाव
कल्पवृक्षाची शितलच छाव
म्हणजे स्वातंत्र्य…..


क्रांतीकारकांच्या जिवाची होळी
त्यांच्या संसाराची राखरांगोळी
म्हणजे स्वातंत्र्य…..
पेटती मशाल क्रांतीची
एक मिसाल संघर्षाची
म्हणजे स्वातंत्र्य…..


जुलमी राजवटीचा तो अंत
संघर्षाचे उदाहरण मूर्तीमंत
म्हणजे स्वातंत्र्य….
नवं सुर्योदयाची ती पहाट
नव स्वर्ण किरणांची लाट
म्हणजे स्वातंत्र्य…..


परकियांचे विदेशी पळायन
स्वकियांचे ते सत्य नारायण
म्हणजे स्वातंत्र्य…..
सर्वा समान ती संधी
विहार सदैव स्च्छंदी
म्हणजे स्वातंत्र्य….


एक हक्काची मूक्त जागा
सुखाचा तलम रेषमधागा
म्हणजे स्वातंत्र्य…..
जया असे जागृत न्यायदेवता
जया खोट्याची नसे वाच्यता
म्हणजे स्वातंत्र्य…


लोकप्रेम,निगा;लोकआस्था
जनजागृती मनी लोकनिष्ठा
म्हणजे स्वातंत्र्य……
एक मोकळा श्वास
विश्वास एक खास
म्हणजे स्वातंत्र्य…..


एकआनंदी असाच क्षण
एक उपलब्धी विलक्षण
म्हणजे स्वातंत्र्य….
स्वातंत्र्ययुध्दाचे महाफल
ऐक्याची ताकद;महाबळ
म्हणजे स्वातंत्र्य…….


मूक्त सभा;भाषणं तया लयी भारी
मिरवणूका,घोषणा नी प्रभातफेरी
म्हणजे स्वातंत्र्य……
सदाकाळ थोर असे मनी सुविचार
सत्कार्य,शौर्य,धैर्य आणि सदाचार
म्हणजे स्वातंत्र्य…..


दीन दुबळ्यांचा उध्दार
एक नवाअसा अवतार
म्हणजे स्वातंत्र्य….
एका नव्या पर्वाचा उगम
क्रांती; देशप्रेमाचा संगम
म्हणजे स्वातंत्र्य…..


मूक्त अनं निर्भीड संचार
जन सामान्यांना आधार
म्हणजे स्वातंत्र्य…..
जुलमी सत्त्येपासून सुटकारा
समूळअंधकाराचा नाश सारा
म्हणजे स्वातंत्र्य…..


एक उत्तम शिष्ठाचार
निषिध्दची स्वैराचार
म्हणजे स्वातंत्र्य…..
एक अदभूत,रम्यसी सोनेरी पहाट
विकासरूपि रोशनाईचा झगमगाट
म्हणजे स्वातंत्र्य…..
सर्वास सार्वजनिकच ती हक्कसुट्टी
आता आजकाळ ती पर्यटनच गट्टी
म्हणजे स्वातंत्र्य……

म्हणजे स्वातंत्र्य | देश प्रेम कविता | Best Desh Bhakti Kavita 2023

Desh Bhakti Kavita 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

म्हणजे स्वातंत्र्य | देश प्रेम कविता | Best Desh Bhakti Kavita 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
23 + 21 =