काव्यबंध या काव्य स्पर्धेसाठी सौ रोहिणी श्रीकांत कोठावदे यांची -जय जवान जय किसान – कविता -देश प्रेम – या विषयावर असून एक Desh Bhakti Marathi Poem आहे
जय जवान जय किसान | Desh Bhakti Marathi Poem

ब्रह्मदेवाने सृष्टी स्वये निर्माण केली
मानवासी दान दिली स्वये भरभरून
त्यात ऋतू तीन ,पावसाळा हा महान
आवडी मजसी मृगसर भिजवी मन ||१||
तहानलेली धरणीची ,व्याकुळता,आतुरता,
ढग गडगडा ,विजा कडकडा, अंधारात
पावसाच्या सरी भरभर भूवर झर झर येत
मातीचा सुगंध जनमन सुखी होत ||२||
कृषीप्रधान देशात सोन्याचा धूर निघतो
“जय जवान” “जय किसान” तिथं नांदतो
माझ्या देशाची धरती उगवते, हिरे,
मोती चातक पक्षी ,वाट पाही पोशिंदा आतुरतो||३||
सुसाट वायूची चाहूल ,आकाश सजले
कोसळत्या जलधारांनी वसुधा चिंब झाली
धरणी माता ,नटली ,हिरवी पैठणी नेसली
जमिनीतून अंकुर बाळासम बागडली||४||
पाऊसात नदी ,नाले ,ओढे, विहिरी भरत
शेती,माती ,झाडे ,वेली ,कसे सार पिकते
धुणं, पाणी ,जगण्याचं पाणी, पुरत राहते
पाणी जीवन आहे ,अमृतासम बरसते||५||
आभाळातून बरसले थेंब टपोरे पावसाचे
अवघे सौंदर्य बहरले ,फुलले, वसुंधरेत
चिमुकले बागडती ,वेली, फुले, हसती मयूर नाचती,
पक्षी गात वृक्षावर बसत||६||
काळ्या मातीत मातीत मनी स्वप्न ठेवतं कष्ट करुनी,
राबुनी, घाम गाळून, विनवून
बळीराजा होऊ दे शेतकऱ्याची आबादानी
सारा तुझा खेळ चातुर्मासी घे खेळून||७||
पावसा, पावसा, असा रे कसा खोचक?
थांब रे थांब, मी नाही देत जा तुज पैसा
आठवणी येता मज बालपण तुला भान
कसे नसता छाता भिजवी तू माझा कैसा||८||
मातीचे घर माझे, आई-बाबा ओरडायची धाबे, झरोके,
बंद करण्या मला धाडायची गाई गुरे हंबरायची
धडाड,धूम, तू यायच वाटेवरनं
आजी बाबा कुडकुडत जायची||९||
सांगते ऐक नीट चातुर्मासात तुझे आगमन अष्टमात करतो
काय सांग माझं म्हणणं?
बळीराजा कष्ट करतो, राबतो, ढगा एवढ
वेळेवर पडायचे हेच भान ठेव बरं तेवढ||10||
लहानपणी माझी शाळा सुटायची सांजेला
पावसात पाठी डोही माझ्या बसायची
डबक्यात कागदी नाव छान सोडायची
बेडकाची डराव, डुक ,बदके धावायची||११||
वाटेवर चिखलातून गाडी धूम पळायची
अंगावर चिखल शिंतोडे उडवून जायची
आजूबाजूची माणसं खी खी हसायची
गाडीवर गरमागरम कांदा भजी खायची||१२||
बालपणीच झाले आता काॅलेजची गत
वारा छेडून, छत्री करत आसे ऊलटी
कॉलेजच्या बुडवायची मजा ही न्यारी मित्र-मैत्रिणींसह घोळक्यात व्हायची पार्टी|| १३||
आता लग्न झाले तरी तू पाठी माझे
सोबत आम्ही बसलो समुद्र किनारी
तु माझे केसांचे बट भिजवून सारे अंग
पाण्याचे थेंब थेंब ओघही गालावरी ||१४||
आता मुला सकट फिरत फिरत आला
तु आमचे सोबत हाॅटेलचा मालक बघत
तु आमचेसह छत्रीवर बसून आला आत
किती गमंत करावी येतो मिरत मिरवत|| १५||
आता आम्ही झालो वयोवृद्ध कस सांगू
नाही जात आम्ही फिरत न जात बागेत
खिडकीत नातूसोंबत बसत जीवन प्रवास
गप्पा मारत पावसाळा व आठवणी काढत||१६||
“जय जवान,” जय किसान “
भारत माता की जय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
जय जवान जय किसान | देश प्रेम कविता | Best Desh Bhakti Marathi Poem 2023

जय जवान जय किसान | देश प्रेम कविता | Best Desh Bhakti Marathi Poem 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
जय जवान जय किसान | देश प्रेम कविता | Best Desh Bhakti Marathi Poem 2023